मुंबईला पावसाने झोडपलं, अर्धी मुंबई अंधारात

मुंबई शहरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बेस्टने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही भागातील वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी, वडाळा, परळ, अपोलो मील कंपाऊंड, नेपीयनसी रोड, नाईक नगर, सायन हॉस्पीटल, सायन कोळीवाडा, परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके मार्ग, डिलाईल रोड येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Updated: Aug 29, 2017, 08:17 PM IST
मुंबईला पावसाने झोडपलं, अर्धी मुंबई अंधारात title=

मुंबई : मुंबई शहरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बेस्टने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही भागातील वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी, वडाळा, परळ, अपोलो मील कंपाऊंड, नेपीयनसी रोड, नाईक नगर, सायन हॉस्पीटल, सायन कोळीवाडा, परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके मार्ग, डिलाईल रोड येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

वरील काही भागांमध्ये पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे. परिस्थिती नियंत्रणात येताच वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आज मुंबापुरीला सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलं आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.