शिवसेनेने पाठिंबा काढला तर नवा फॉर्म्युला सांगितला पृथ्वीराज चव्हाणांनी
शिवसेनेने राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय पर्याय असून शकतो यातील एक पर्याय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविला.
Feb 10, 2017, 06:47 PM IST15 हजारांपेक्षा कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
15 हजार आणि त्याहून कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारनं खुशखबरी दिलीय.
Jan 28, 2017, 11:10 PM ISTसरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर
केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत. पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती.
Jan 16, 2017, 08:15 PM ISTनरेंद्र मोदी सरकार जनतेला मोठे गिफ्ट देण्याच्या विचारात
नरेंद्र मोदी सरकार आता जनतेला मोठा गिफ्ट देण्याच्या विचारात आहे, यूनिवर्सल बेसिक इनकम योजना लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
Jan 16, 2017, 04:27 PM ISTकाळ्या यादीतील ब्रिटीश कंपनीला देणार नोटा छापायला
देशाच्या गृह खात्यानं ब्लँकलिस्ट केलेल्या ब्रिटीश कंपनीला सरकार आता नोटा छापण्यास देण्याची तयारी करतेय. नवीन चलन हे संपूर्ण भारतीय असेल असे पंतप्र्धानानि सरकार येताच घोषणा केली होती. तेलगी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलेला नसताना तसच करन्सी नोट प्रेसच्या घोटाळे समोर येत असताना या अनाकलनीय निर्णयाने चलन सुरक्षित राहणार आहे का असा प्रशन निर्माण झाला आहे. बघू या विशेष रिपोर्ट
Jan 6, 2017, 07:49 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं 'फेरीवाला धोरण'!
मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातल्यात. याच निवडणुकीवर डोळा ठेवत मुंबई महानगरपालिकेत फेरीवाला धोरण मांडलं जातंय.
Jan 3, 2017, 11:12 AM ISTनगराध्यक्षांचे अधिकार सरकारने वाढविले - रणजीत पाटील
थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा, नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणूकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.
Dec 16, 2016, 07:56 PM ISTबुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई
जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय.
Dec 14, 2016, 12:39 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!
आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे.
Dec 14, 2016, 10:55 AM ISTनोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!
नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.
Dec 10, 2016, 08:17 AM ISTजलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ?
राज्यात सरकारच्यावतीने जलयुक्त योजनेच्या नावाखाली जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामांवेळी ग्रामपंचायतीचाही सहभाग घेण्यात आला होता. त्यानंतर या कामांच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना आपल्या निधीतून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ? असा प्रश्न विचारात प्रश्नोत्तरांच्या तासात आमदार नितेश राणे यांनी हरकत उपस्थित केली.
Dec 9, 2016, 08:28 PM ISTआता रेल्वेत 'GIVE IT UP' आणणार सरकार!
एलपीजी सिलिंडरची सबसिडी सोडण्यासाठी सरकारने आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी अनुदान सोडून द्या, असे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सरकारने भारतातील सर्वात मोठे जाळे असणाऱ्या रेल्वेत 'GIVE IT UP' ची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिट अनुदानासाठी 'GIVE IT UP' चे आवाहन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 10:33 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 08:09 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
Nov 4, 2016, 06:57 PM ISTउरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव
जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे.
Sep 19, 2016, 11:41 PM IST