exam

नोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.

Jun 8, 2014, 03:06 PM IST

मुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... मुंबई विद्यापीठाच्या विविध कॉलेजेसमध्ये २८ मार्च आणि १ एप्रिलला होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायत. प्राध्यापक आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी जावं लागत असल्यामुळे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

Mar 27, 2014, 07:53 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली

बारावी पाठोपाठ आता दहावी परीक्षांच्या हॉल तिकीटांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापकांमध्येच परीक्षांबाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.

Feb 11, 2014, 06:38 PM IST

राज्यात आठवीपर्यंतच्या पुन्हा परीक्षा - अजित पवार

राज्यात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा होण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकार पुढील अधिवेशनात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा घ्याव्यात यासंदर्भात प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून पुढे केंद्राकडे पाठवण्यात येणारेय. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.

Sep 6, 2013, 11:29 AM IST

पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)

बारावीचं पुढच्या वर्षाचं म्हणजेच मार्च २०१४ चं परिक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.

Jul 2, 2013, 12:32 PM IST

परीक्षाचं चाललयं तरी काय?

एमकॉमची परीक्षा २ मे ऐवजी ५ मे रोजी होण्याचे विद्यापीठाने तूर्तास जाहीर केले आहे. परंतु सीएच्या परीक्षांमुळे ही तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

May 1, 2013, 12:03 PM IST

द्या नेट-सेट आणि व्हा सेट...

नेट- सेटची परीक्षा प्रत्येक प्राध्यापकाला द्यावीच लागेल, याचा पुनरूच्चार राज्य सरकारतर्फे मंगळवारी मुंबई हायकोर्टात करण्यात आला. प्राध्यापकांच्या १३ मागण्यांपैकी ११ मागण्या मान्य केल्या आहेत.

May 1, 2013, 11:55 AM IST

ड्रायव्हर व्हायचंय? मराठी व्याकरणाचा करा अभ्यास!

ड्रायव्हर व्हायचंय?... मग, मराठी व्याकरणावर द्या भर… ऐकून आश्चर्य वाटलं ना?... पण होय, तुम्हाला ड्रायव्हर होण्यासाठीही तुमचं मराठी व्याकरण सुधारावं लागणार आहे. कारण...

Apr 12, 2013, 11:54 AM IST

नाशिकमध्ये कुत्र्यांची दहशत!

नाशिक शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या चार दिवसात २० हून अधिक बालकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय.

Apr 9, 2013, 10:13 PM IST

'एमपीएससी परीक्षा वेळेतच घेणार....'

एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोंधळ सुरू असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतलाय. याबाबत एमपीएससीच्या सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

Apr 3, 2013, 04:02 PM IST

परीक्षा आली, मुलांना टेन्शन देऊ नका....

परीक्षा म्हटलं की साऱ्यांचाच मनात धडकी भरते. या काळात मुलांवरचा मानसिक ताण प्रचंड वाढतोय. या ताणाची परिणती मानसिक स्वास्थ्य बिघड़ण्यामध्ये होऊ लागलीये.

Mar 16, 2013, 10:34 PM IST

पुस्तक समोर ठेवा आणि द्या परीक्षा...

पुस्तकांत सामाविष्ट करण्यात आलेले धडे समजावून न घेता केवळ घोकंपट्टी करणाऱ्या मुलांना कदाचित यापुढे अशी घोकंपट्टी करण्याची गरजच उरणार नाही, असं दिसतंय.

Mar 14, 2013, 01:46 PM IST

मनसेचा लढा सुरू, मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी

प्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये.

Mar 7, 2013, 04:17 PM IST

मनसेनं उधळली सेन्ट्रल बँकेची परीक्षा; परप्रांतियांना पिटाळलं

आज मुंबईत सेन्ट्रल बँकेच्या क्लार्क पदाची भरती प्रकिया सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणावर एकच गोंधळ उडवून दिलाय. सिद्धार्थ कॉलेजच्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ही भरती प्रक्रिया उधळून लावलीय.

Feb 22, 2013, 12:33 PM IST

राज्यसरकारकडून विद्यार्थ्यांना ‘गुड’न्यूज!

होय, राज्यातल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं एक गूड न्यूज दिलीय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपेपर्यंत राज्यात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.

Feb 13, 2013, 10:19 AM IST