www.24taas.com, मुंबई
एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोंधळ सुरू असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतलाय. याबाबत एमपीएससीच्या सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर परीक्षा रविवारीच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान सभेत दिली.
केवळ पैसे भरल्याची पावती दाखविल्यावर परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल. तसेच परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांची माहिती SMS द्वारे मिळणार असल्याचे सांगितले.
रात्रंदिवस काम करून यंत्रणा कार्यान्वित करणार असून ठरलेल्या वेळेनुसारच परीक्षा घेण्यात येतील असा निर्णय या चर्चेतनंतर घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री थोड्याच वेळात विधान परिषदेत निवदेन करणार आहेत. मात्र उद्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे प्रोफाईल अपडेट होतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधेवर मर्यादा असल्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे काय असाही सवाल उपस्थित होतोय. त्यामुळं परीक्षा पुढे ढकलणेच योग्य होणार असल्याचं बोललं जातयं.