exam

मुंबई विद्यापीठ घेणार फेरपरीक्षा

कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा कक्षाला आग लागल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेचा मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना फटका बसला होता. पेपरसाठी वेळेत काहींना जाता आले नव्हते तर काही विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठ फेर परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Apr 19, 2012, 02:22 PM IST

आयआयटी प्रवेशासाठी जेईईची परीक्षा

आयआयटी प्रवेशासाठी जेईईची परीक्षा रविवारी होतेय. अत्यंत आव्हानात्मक अशा या परीक्षेसाठी देशभरातून पाच लाखांवर विद्यार्थी बसणार आहेत. राज्यात ५४ केंद्रांवर ही परीक्षा होईल. ही मुलं अभ्यासात मग्न आहेत. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा रविवारी देशभरात होत आहे.

Apr 7, 2012, 08:41 PM IST

परीक्षांच्या काळात स्कूल बसचालकांचा संपाचा इशारा

९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

Feb 29, 2012, 02:00 PM IST

शिक्षक की गुन्हेगार?

कॉपी प्रकरणात शिक्षकांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास शिक्षकांचा विरोध होऊ लागला आहे. शिक्षकांवर कॉपी प्रकरणी फौजदारी कारवाई केल्यास दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

Feb 27, 2012, 01:47 PM IST

राज ठाकरे परीक्षेबाबत समाधानी

"परीक्षेसाठी अभ्यास करुन उमेदवारांनी प्रमाणिकपणे परीक्षा दिली" या गोष्टीचं मला खूप समाधान वाटतंय, या शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी झालेल्या परीक्षेबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Dec 5, 2011, 06:33 AM IST

मनसे झाली लेखी परीक्षा, आता निकालाची प्रतिक्षा!

आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे इच्छुकांची आज परीक्षा झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड अशा सहा शहरांमध्ये ही परीक्षा झाली. एकून 3156 इच्छुकांनी ही परीक्षा दिली.

Dec 4, 2011, 03:35 PM IST

नाशिककरांना आवडला मनसेचा 'फंडा'!

मनसेच्या अर्ज विक्रीला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांत नाशिकमध्ये साडे पाचशे फॉर्म्स विकले गेलेत. विशेष म्हणजे हे फॉर्म्स भरण्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापकांचीही गर्दी होतेय.

Nov 23, 2011, 08:30 AM IST

....तर मीही परीक्षा देणार - राज ठाकरे

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी तसच इच्छूक उमेदवारांचा मेळावा आज सकाळी 11 वाजता माटुंग्यातील षणमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

Nov 19, 2011, 08:30 AM IST

'नेट' साठी व्हा 'सेट'

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ संशोधक पात्रता (सेट) व प्राध्यापक पात्रता व प्राध्यापक पात्रता (नेट) परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतायंत.

Oct 20, 2011, 09:19 AM IST