enforcement directorate

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Dec 2, 2023, 09:00 AM IST

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

ईडी म्हणजे  अंमलबजावणी संचालनालय. ही एक  इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. सध्या देशात ईडी चांगलीच चर्चेत आहे. पण याच ईडीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 

Nov 2, 2023, 02:18 PM IST

वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

DHFL Scam: वाधवान बंधुंचा हा घोटाळा 17 बँकांच्या कन्सोर्टियमचा समावेश असलेल्या 34 हजार 615 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित असल्याचे असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे. 

Oct 27, 2023, 09:38 AM IST

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

ED Arrest Sujit Patkar: कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Aug 17, 2023, 05:26 PM IST

कोविड घोटाळा प्रकरण: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक, ED ची मोठी कारवाई

ED Arrest Sujit Patkar: कोविड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे ईडीने ही कारवाई केली. 

 

Jul 20, 2023, 11:56 AM IST

"आनंद साजरा करणारे...", सुप्रीम कोर्टाने ED संचालकांची मुदतवाढ अवैध ठरवल्यानंतर अमित शाह यांचं स्पष्ट मत

Amit Shah on ED: सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजयकुमार मिश्रा (Sanjay Mishra) यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवली आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारसाठी हा मोठा दणका असल्याचं म्हटलं आहे. त्यावर अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Jul 12, 2023, 09:17 AM IST

बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...

Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे. 

Jul 2, 2023, 08:46 AM IST

मंत्र्यांना ED कडून अटक कायदेशीर की बेकायदेशीर? 16 तास घमासान झाल्यानंतर हायकोर्टने दिले 'हे' निर्देश

Madras High court On ED Arrest: मंत्र्यांना ईडीकडून अटक होणं कायदेशीर की बेकायदेशीर? या विषयावर मद्रास हायकोर्टात तब्बल 16 तास घमासान पाहायला मिळाले. 

Jun 28, 2023, 12:50 PM IST

ईडीची भीती की आणखी काही? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोस्टरबाजी

राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ याच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापण्यात आले आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं मुश्रीफांकडून आयोजन करण्यात आलं आहे. 

 

Jun 23, 2023, 03:02 PM IST

BMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:14 PM IST

ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरी ED ने धाड टाकल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "ज्यांचे संबंध..."

Devendra Fadnavis on ED Raid: कोव्हिड सेंटर कथित घोटाळा (Covid Centre Scam) प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) आज 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Sooraj Chavan) यांचाही समावेश आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे. 

 

Jun 21, 2023, 01:22 PM IST

किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video

Senthil Balaji Cry : छाती पकडून ओक्साबोक्शी रडताना एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. नेमकं झालं तरी काय?

Jun 14, 2023, 09:35 AM IST