ED Officer Arrest : महाराष्ट्रासह देशातील अनेक महत्वाच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे ईडी सतत चर्चेत असते. देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह अब्जाधिशांना घाम फोडणारी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ईडी (Enforcement Directorate) अर्थात अंमलबजावणी संचालनालय. ईडी ही भारत सरकारच्या महसूल विभा आणि अर्थ मंत्रालय अंतर्गत येणारी एक विशेष आर्थिक तपास यंत्रणा आहे. पूर्ण भारतात बेहिशेबी मालमत्ता आणि करोडोच्या घोटाळ्यांचा तपास ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा करते. पण याच ईडीच्या अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लाखोंची लाच मागितल्याचा आरोप
राजस्थानमध्ये (Rajasthan) गेल्या काही दिवसात ईडीने काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष गोविंद सिह डोटारस यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतची FERA शी संबंधीत चौकशी करण्यात आली होती. आता राजस्थान एसीबीने ईडीच्या एका अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली आहे. एका मध्यस्थामार्फत पंधरा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवल किशोर मीना असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव आहे. यानंतर राजस्थान सरकारच्या तपास यंत्रणांनी ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याने बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा संशय एसीबीला होता. त्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. तसंच त्या अधिकाऱ्याशी संबंधीत काही जागांवर छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी एसीबी अधिकारी लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. नवल किशोर मीना हे अंमलबजावणी संचालनालयात ईओ म्हणून कार्यरत आहेत. चिटफंडशी संबंधित प्रकरण बंद करण्यासाठी तसंच मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि अटकेपासून वाचवण्यासाठी 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा नवल किशोीर मीना यांच्यावर आरोप आहे.
एसीबीचं निवेदन
याप्रकणी एसीबीने एक निवेदन जारी केलं आहे. ईडी अधिकारी नवल किशोर मीना आणि त्याचा साथीदार बाबूलाल मीना यांना खैरथल तिजारा जिल्ह्यातील मुंडावर इथल्या एका व्यक्तीकडून 15 रुपये लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराने एसीबीला याप्रकरणाचा आधीच माहिती दिली होती. इम्फाळमधल्या एका चिटफंड प्रकरणाता अटक न करमयासाठी नवल किशोर मीना यांनी 17 लाखांची लाच मागितली होती. यातले पंधरा लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली.