Success Story:कधीकाळी झोपडीत राहून मुंबईच्या रस्त्यावर विकायचे पुस्तके, गरिबीतून उभारले कोट्यावधीचे साम्राज्य!

Rizwan Sajan Success Story:  रिझवान साजन असे त्यांचे नाव असून दुबईतील सर्वात मोठ्या श्रीमंत भारतीयांमध्ये यांचे नाव घेतले जाते.   

Pravin Dabholkar | Updated: May 31, 2024, 04:56 PM IST
Success Story:कधीकाळी झोपडीत राहून मुंबईच्या रस्त्यावर विकायचे पुस्तके, गरिबीतून उभारले कोट्यावधीचे साम्राज्य! title=
Rizwan Sajan Success Story

Rage to Rich Rizwan Sajan: अनेक मुलांचा जन्म गरिबीत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत होतो. पण अभ्यास, मेहनतीच्या जोरावर ते परिस्थिती बदलतात. कोणी झोपडीत राहणारा मुलगा भविष्यात कोट्यावधीचा व्यवसाय करेल, असं कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ते याचेच एक मुर्तीमंत उदाहरण आहेत. रिझवान साजन असे त्यांचे नाव असून दुबईतील सर्वात मोठ्या श्रीमंत भारतीयांमध्ये यांचे नाव घेतले जाते. 

रिझवान हे कधीकाळी मायानगरी मुंबईतील झोपडपट्टीत राहायचे. रिझवान यांनी रस्त्यावर जाऊन पुस्तके विकली. आता ते डेन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. कठीण परिश्रम आणि अतूट संकल्पाच्या बळावर ते करिअरमध्ये टॉपवर पोहोचले. त्यांचे आयुष्य लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. 

डेन्यूब ग्रुपचे मालक 

रिझवान साजन हे अनिवासी भारतीय उद्योजक आहेत. ते संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये राहतात. डेन्यूब ग्रुप 1 अरब डॉलरची उलाढाल करतो. डेन्यूब ग्रुप यूएईचा बहुराष्ट्रीय समूह आहे. याचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. हा ग्रुप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतो. 

बांधकाम साहित्यांचे सप्लायर

डेन्यूब ग्रुप हा सिमेंट, रेती, स्टील आणि लाकूड अशा बांधकाम साहित्यांचा प्रमुख सप्लायर आहे. हा समूह प्री फॅब्रिकेटेड इमारती, रियल इस्टेट डेव्हलपेमेंट या सारख्या व्यवसायामध्ये आहे. तसेच डेन्यूब ग्रुपचा विस्तार यूएई, ओमान, बहरीन, साऊद अरब, कतार आणि भारतात पसरला आहे. 

मुंबईच्या रस्त्यांवर विकली पुस्तके

रिझवान साजन यांच्या जन्म मुंबईत एका अत्यंत गरीब परिवारात झाला. सुरुवातीच्या दिवसात त्यांना पुस्तके आणि फटाके विकावे लागले. कुटुंबाला सहारा देण्यासाठी ते दूध विकायचे. त्यांची व्यवसायाची ही पहिली पिढी आहे. 

रिझवान 16 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर 1981 मध्ये कुवैतमध्ये रिझवान यांनी आपल्या काकांच्या बांधकाम साहित्यांच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. 

रिझवान यांनी एक सेल्समन म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1991 मध्ये खाडी युद्धामुळे त्यांना मुंबईत परतावं लागलं. 1993 मध्ये साजन यांनी डेन्यूब ग्रुपची स्थापना केली. त्यांचा हा ग्रुप अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये विस्तारला आहे. 

यशाचे श्रेय 

आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही, असे साजन सांगतात. त्यामुळे ते आपल्या यशाचे श्रेय कठोर मेहनतीला देतात. फुटपाथवरील वेंडर ते अरबपती बनण्याचा त्यांचा प्रवास त्यांची दृढता आणि समर्पणाचा पुरावा आहे. यामुळे परिस्थितीचे कारण सांगणाऱ्या तरुणांना यामुळे आयुष्यात काहीतरी करण्याची उमेद निर्माण होईल.