dawood ibrahim

दहशतवादी टुंडाला न्यायालय परिसरात थोबाडले

भारतात दहशत पसरवणारा पाकिस्तानी जहाल अतिरेकी अब्दुल करीम टुंडा याचे हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात थोबाडच फोडले. भारतीय तुरुंगातून सुटका होताच आपण पुन्हा दहशतवादी हल्ले करणार असे सांगत टुंडाने नुकतेच भारताला आव्हान दिले होते.

Aug 21, 2013, 09:29 AM IST

‘... तर मोदी दाऊदला खेचून आणतील’- उद्धव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळलीय. ‘सामना’तल्या संपादकीयमधून त्यांनी मोदींची स्तुती केलीय. “जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ते माफिया डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणतील आणि त्याला फाशीवर लटकवतील”, असा शिवसेनेला वाटतं.

Aug 18, 2013, 01:01 PM IST

मोस्ट वॉटेंड दाऊद पाकिस्तानात, पाकचीच कबुली

दाऊद इब्राहिमबाबत पाकिस्तानचं पितळ उघड झालं आहे. दाऊद पाकिस्तानातच होता, मात्र आता सौदी अरेबियात (युएईमध्ये) पळाला असावा, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी दिली आहे.

Aug 10, 2013, 07:00 AM IST

डॉन दाऊदच्या तीन ठिकाणांची माहिती

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मंगळवारी ६००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यातमध्ये कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम यांच्या कारनाम्याची तीन ठिकाणे नमुद करण्यात आली आहेत. तर दोन वेळा त्यांने बुकींशी संपर्क केल्याचे स्पष्ट म्हटलं आहे. दोनदा तसे रेकॉर्ड करण्यात आल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.

Jul 31, 2013, 11:45 AM IST

ऋषी कपूर `दाऊद इब्राहिम`च्या भूमिकेत?

“ट्रिगर खींच, मामला मत खींच” असा डायलॉग मारणारा ऋषी कपूर ‘डी डे’ सिनेमाच्या प्रोमोमध्ये दिसल्यावरच ऋषी कपूर दाऊदची भूमिका साकारत असल्याचं लक्षात आलं.

Jul 11, 2013, 05:36 PM IST

स्पॉट फिक्सिंगः दाऊद आणि छोटा शकीलचा हात

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांचा हात असल्याची माहिती दिल्ली पोलिसातील सूत्रांनी दिली आहे.

Jun 4, 2013, 07:13 PM IST

सट्टेबाजीतील कमाई `हरामा`ची, आम्ही ते करत नाही- छोटा शकील

IPL च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये डी कंपनीचं नाव सध्या गाजत आहे. स्पॉट फिक्सिंगचं दुबई कनेक्शन दाऊद इब्राहिमशी जाऊन मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दाऊदचा स्पॉट फिक्सिंगशी कुठलाही संबंध नसल्याचं दाऊद इब्राहमचा उजवा हात असणाऱ्या छोटा शकीलने म्हटलं आहे.

May 23, 2013, 03:51 PM IST

वेदनेची २० वर्षे

साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता...मुंबई रक्ताने न्हावून निघाली होती...हे का घडलं ? कोणी घडवून आणलं ? असा प्रश्न त्यावेळी मुंबईकरांना प़डला होता..पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भीषण बॉम्बस्फोटा मागच्या सूत्रधाराचा चेहरा समोर आला...

Mar 12, 2013, 11:40 PM IST

नितीन गडकरींना भाजपचा ठाम पाठिंबा

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर भाजप नितीन गडकरींच्या पाठिशी ठाम राहिला आहे. स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डॉन दाऊद यांची तुलना केल्याने गडकरींवर जोरदार टीका झाली. याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांनी राजीनाम्याची मागणी गेली. मात्र, गडकरींवरील सर्व आरोप चुकीचे आहेत, अशी भूमिका घेत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत गडकरींना पाठिंबा देण्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

Nov 7, 2012, 04:10 PM IST

विवेकानंद आणि दाऊदचा आयक्यू समान - गडकरी

पूर्ती कंपनीच्या गुंतवणूकदारांवरुन झालेल्या आरोपांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच नितीन ग़डकरी यांच्यावर आणखी एक वाद ओढावलाय. भोपाळमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलयं.

Nov 5, 2012, 12:26 PM IST

कंदाहार विमान अपहरण : दहशतवाद्याला अटक

जम्मू काश्मीर पोलिसांनी कंदाहार अपहरणाशी संबंधित दहशतवाद्याला अटक केली आहे. पोलिसांनी मेह्राजुद्दिन दांड उर्फ जावेदला किश्तवाड येथून अटक केली.

Sep 13, 2012, 01:44 PM IST

मी दाऊद इब्राहिमला भेटलो होतो- संजय दत्त

आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला एकदा भेटलो असल्याची कबुली अभिनेता संजय दत्त याने सुप्रीम कोर्टाला दिली. दाऊद इब्राहिम याच्याबरोबर दुबई येथे डिनर केल्याचं संजय दत्त याने मान्य केलंय. घरात आढळलेल्या बेकायदेशीर रायफलच्या केसबद्दल बोलताना ही गोष्ट संजय दत्तने सांगितली.

Aug 15, 2012, 11:33 AM IST

भारत-पाक बैठक; सईद, दाऊद यांच्यावर चर्चा

भारत आणि पाकिस्तानमधील प्रमुख अधिकाऱ्यांची आज एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पहिल्यांदाच आयबी आणि एनआयएसांरख्या चौकशी संस्था यात भाग घेणार आहेत. या बैठकीत सईद आणि दाऊद यांसारख्या गुन्हेगारांना भारताकड सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे.

May 24, 2012, 01:27 PM IST

अमेरिकेत दाऊदच्या साथीदारांना बंदी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्यावर अमेरिकेनं बंदी घातलीये. छोटा शकील आणि टायगर मेमन अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळं ही बंदी लादण्यात आलीये.

May 16, 2012, 05:42 PM IST

छोटा शकील, मेमनला अमेरिकेत बंदी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन या दोघांवर अमेरिकेची बंदी घालण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळं अमेरिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

May 16, 2012, 11:49 AM IST