www.24taas, झी मीडिया,नवी दिल्ली
अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३मधील मुंबई साखळी स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याला कोणत्याही परिस्थिती भारतात आणले जाईल. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेबरोबर मोहीम राबविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने अमेरिकेने २००३ मध्ये दाऊद इब्राहिमचा मोस्ट वाँन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता. दाऊद हा पाकिस्तामध्येच आहे. दाऊदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी पाकिस्तानवर सतत दबाव टाकण्यात येत आहे. आम्ही आतापर्यंत काही महत्त्वाच्या दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे. दाऊद हा जागतिक स्तरावर कार्यरत असलेला दहशतवादी असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही अमेरिकेची मदत घेण्याच्या तयारीत आहोत, असे शिंदे म्हणालेत.
मी केलेल्या अमेरिका दौऱ्यात याविषयी एफबीआय आणि महा न्यायप्रतिनिधी एरिक होल्डर यांच्याशी दाऊदच्या पाकिस्तानमधील वास्तव्याविषयी चर्चा केली होती. दाऊदला ताब्यात घेण्यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्त मोहिम राबविण्याची गरज आहे. तर भारतीय गुप्तहेर यंत्रणांच्या मदतीने पोलिसांनी नुकतेच अब्दुल करीम टुंडा, यासिन भटकळ या दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. यांना अटक केल्यानंतर दाऊदलाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे शिंदे आधीच स्पष्ट केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.