www.24taas.com, नवी दिल्ली
कंदाहार अपहरणाशी संबंधित दहशतवाद्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मेह्राजुद्दिन दांड उर्फ जावेदला किश्तवाड येथून अटक केली.
जावेद हा युनायटेड जिहास कौन्सिलचा सदस्य आहे.त्याने कंदाहार अपहरण प्रकरणातील दहशतवाद्यांना खोटे कागदपत्र पुरवले होते. आणि दहशतवाद्यांना रसद ही पुरवली होती.गेल्या २० वर्षापासून जावेद हा जम्मूकाश्मीर परिसरात सक्रीय आहे. आणि तो भारतात नेपाळमार्गे आला होता.
भारताने पाकिस्तानला ज्या २० मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी दिली होती त्यात जावेदच्या नावाचाही समावेश होता. जावेद हा दहशवादी कारवायांसाठी पैसे जमवण्याचे काम करायचा. त्याने याआधी लष्कर ए तौयबा आणि हिजबुल मुजाहिदीन बरोबर सुद्धा काम्केल आहे.
१९९६ साली दिल्लीतील लजपत नगर येथे झालेल्या स्फोटावेळी जावेदच नाव समोर आलं होत. तसच जावेदचे संबंध हे दाउदशी असल्याचे सूत्रांनी सांगितले. जावेद हा नेपालमध्ये हिंदू बनून राहत होता. त्याने नाव बदलून नेपाळमध्ये लग्नही केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
कधी केले विमानाचे अपहरण
इंडियन एयरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाचे २४ डिसेंबर १९९९ मध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. हे विमान काठमांडूहून दिल्लीला येत होते. या विमानात १७८ यात्री होते. दहशतवाद्यांनी प्रवाश्यांमधील एकाची हत्या केली होती. तब्बल ७ दिवसानंतर हे विमान दहशतवाद्यांच्या ताब्यातून सोडवण्यात आले. त्या बदल्यात ३ दहशतवाद्यांची सुटका केली.