dadri lynching

असहिष्णुता प्रकरण : आमिरच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले

 अभिनेता शाहरूख खानने आपला सहकलाकार आमिर खान याचे समर्थन केले आहे. एक आठवड्यापूर्वी आमिर खान चर्चेत आला होता. त्याने एका मुलाखतीत देशातील वाढत्या असहिष्णुतेवर वक्तव्य केले होते. 

Dec 1, 2015, 12:58 PM IST

हिंदू मुलीशी इखलाकच्या मुलाचे संबंध म्हणून दादरीकांड

 दादरीकांड हे खासगी भांडणाचा परिणाम होता, असा दावा आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला  आहे. मोहम्मद इखलाक याच्या दोन मुलांपैकी एकाचे हिंदू मुलीशी प्रेमसंबंध होते. यात राजकारण करण्यात आले असून त्याला चुकीच्या पद्धतीने गोमांसशी जोडले असल्याचा दावाही एबीव्हीपीने केला आहे. 

Oct 26, 2015, 01:50 PM IST

शिमल्यात गाय तस्कराची बेदम मारहाण करून हत्या

उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीला गाईंची तस्करी करण्याचा संशयावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार केले. या प्रकरणात तस्कराचे साथीदार असलेल्या चार जण जंगलात पळून गेले, त्यांना चार तासांनंतर पकडण्यात आले. 

Oct 16, 2015, 07:28 PM IST

मोदींना सिद्धूसाठी ट्विट करता येतं पण 'दादरी'बाबत नाही - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवज्योत सिंह सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट केलं. त्यावरूनच ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना टार्गेट केलंय. पंतप्रधानांना सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट करायला वेळ आहे पण अखलाकच्या हत्येबाबत नाही.

Oct 7, 2015, 04:12 PM IST

अखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला

गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अखलाक या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अकलाकच्या कुटुंबियांना भेटायला राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या असतांनाच... अखलाकनं बचावासाठी अखेरचा फोन आपल्या हिंदू मित्राला केल्याचं पुढे आलंय. 

Oct 5, 2015, 10:20 AM IST