cwc 15

सिडनीतील सेमीफायनलसाठी हवाय चाहत्यांचा पाठिंबा - क्लार्क

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे. सिडनीतील सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या समर्थकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन क्लार्कनं ट्विटरद्वारे केलं आहे. 

Mar 23, 2015, 06:43 PM IST

टीम इंडियानं वहाब रियाजकडून शिकावं: रमीज राजा

पाकिस्तानचा माजी कॅप्टन रमीज राजाचं म्हणणं आहे की, भारतीय बॅट्समनना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी वहाब रियाजच्या स्पेलकडून शिकणं गरजेचं आहे. गुरूवारी एससीजीमध्ये वर्ल्डकप सेमीफायनल दरम्यान मायकल क्लार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन टीमची दुर्बलता जाणून घेत त्याचा फायदा भारतीय टीमनं घ्यायला हवा. 

Mar 22, 2015, 06:32 PM IST

'अंपायर्सनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो' - हसिना

वर्ल्डकपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये भारताकडून झालेला पराभव बांग्लादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवलं असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे.

Mar 22, 2015, 05:29 PM IST

टीम इंडियानं खरी करून दाखवली सचिनची भविष्यवाणी!

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट याबद्दल काहीच सांगायची गरज नाही. वर्ल्डकपबद्दल सचिननं केलेली भविष्यवाणी खरी ठरलीय आणि ती खरी करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Mar 22, 2015, 04:36 PM IST

टीम इंडियाला भारताला सेमीफायनलचा मौका

रोहित शर्माच्या १३७ दमदार सेंच्युरीनंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळं भारतानं बांग्लादेशचा १०९ रन्सनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

Mar 19, 2015, 05:45 PM IST

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास अजमलला मौका?

पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितलं की, पाकिस्तान टीम जर वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ऑफ स्पिनर सईद अजमलला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.

Mar 19, 2015, 03:34 PM IST

'वर्ल्डकप 2015'वर बनलेला हा खास व्हिडिओ होतोय वायरल

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. दोन व्यक्ती टीम इंडियाची जर्सी घालून सामान्य तरुणांच्या ग्रृपमध्ये जातात आणि त्यांना प्रश्न विचारून पैसे जिंकण्याची संधी देतायेत.

Mar 19, 2015, 02:13 PM IST

आज भारत-बांग्लादेश मॅचनंतर हे रेकॉर्ड्स!

मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.

Mar 19, 2015, 12:49 PM IST

क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला

 क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

Mar 17, 2015, 02:17 PM IST

रैनाच्या वाग्दत्त वधूचा फोटो सोशल मीडियावर वायरल

टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन सुरेश रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. यात सुरेश आणि त्याची वाग्दत्त वधू प्रियंका चौधरी दिसतेय. 

Mar 17, 2015, 11:08 AM IST

'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'

बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'

Mar 17, 2015, 09:29 AM IST

रोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.

Mar 16, 2015, 12:50 PM IST

... तर भारत-पाकिस्तान होईल सेमीफायनल!

 पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या विजयानंतरच वर्ल्डकप २०१५च्या क्वार्टर फायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. भारताची क्वार्टर फायनल बांग्लादेशसोबत आहे आणि भारतासाठी ही वाटचाल सोपी असेलय मात्र जर ऑस्ट्रेलियाला हरवून पाकिस्ताननं सेमीफायनल गाठली तर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात...

Mar 16, 2015, 10:34 AM IST

रैनाच्या सेंच्युरीनंतर पूनमकडून असं अभिनंदन!

सोशल मीडियावरील स्टार आणि आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  वर्ल्डकपमध्ये भारतानं झिम्बाब्वेला पराभूत केल्यावर तिनं ट्वीटरच्या माध्यमातून महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाचं कौतुक केलं आहे.

Mar 15, 2015, 02:34 PM IST

मुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय.

Mar 15, 2015, 11:12 AM IST