टीम इंडियानं वहाब रियाजकडून शिकावं: रमीज राजा

पाकिस्तानचा माजी कॅप्टन रमीज राजाचं म्हणणं आहे की, भारतीय बॅट्समनना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी वहाब रियाजच्या स्पेलकडून शिकणं गरजेचं आहे. गुरूवारी एससीजीमध्ये वर्ल्डकप सेमीफायनल दरम्यान मायकल क्लार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन टीमची दुर्बलता जाणून घेत त्याचा फायदा भारतीय टीमनं घ्यायला हवा. 

Updated: Mar 22, 2015, 06:32 PM IST
टीम इंडियानं वहाब रियाजकडून शिकावं: रमीज राजा title=

नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी कॅप्टन रमीज राजाचं म्हणणं आहे की, भारतीय बॅट्समनना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी वहाब रियाजच्या स्पेलकडून शिकणं गरजेचं आहे. गुरूवारी एससीजीमध्ये वर्ल्डकप सेमीफायनल दरम्यान मायकल क्लार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन टीमची दुर्बलता जाणून घेत त्याचा फायदा भारतीय टीमनं घ्यायला हवा. 

डावखुरा फास्ट बॉलर रियाजनं आपल्या बॉलिंगनं ऑस्ट्रेलियन बॅट्समनना चांगलाच त्रास दिला. मात्र राहत अलीनं रियाजच्या बॉलवर शेन वाटसनची सोपी कॅच सोडून विरोधी टीमला मजबूत स्थितीत येण्याचा मौका दिला. 

रमीज राजा यांनी कॉमेंट्री दरम्यान सांगितलं, ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनच्या क्रमासमोर त्यांच्या फास्ट आणि बाऊसंरचं उत्तर नव्हतं. पाकिस्ताननं भलेही मॅच गमावली, मात्र जर भारतीय बॉलर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला थांबवू इच्छितो तर रियाजच्या प्रदर्शनाकडून जरा शिकावं आणि त्यांच्या दुर्बलतेवर काम करावं. 

सर्वांच्या नजरा आता भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलवर आहेत. दोन्ही टीम वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत १० वेळा आमनेसामने आल्या. त्यातील ७ वेळा ऑस्ट्रेलियानं मॅच जिंकली तर भारताला केवळ ३ मॅच जिंकता आल्या. २०११ च्या वर्ल्डकपमधील क्वॉर्टरफायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पाच विकेटनं पराभूत केलं होतं. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.