'वर्ल्डकप 2015'वर बनलेला हा खास व्हिडिओ होतोय वायरल

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. दोन व्यक्ती टीम इंडियाची जर्सी घालून सामान्य तरुणांच्या ग्रृपमध्ये जातात आणि त्यांना प्रश्न विचारून पैसे जिंकण्याची संधी देतायेत.

Updated: Mar 19, 2015, 02:13 PM IST
'वर्ल्डकप 2015'वर बनलेला हा खास व्हिडिओ होतोय वायरल title=

नवी दिल्ली: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. दोन व्यक्ती टीम इंडियाची जर्सी घालून सामान्य तरुणांच्या ग्रृपमध्ये जातात आणि त्यांना प्रश्न विचारून पैसे जिंकण्याची संधी देतायेत.

वर्ल्डकपची निगडित छोटे-छोटे प्रश्न विचारून प्रत्येक बरोबर प्रश्नाला 1000 रुपये कमविण्याची संधी यात दिलीय. कुणी 3000 तर कुणी 5000 रुपये जिंकलेत. मात्र यानंतर विजेत्यांना झटका बसतो, जेव्हा कुणी तिसराच मौके पे चौका मारून जातो. म्हणजे या टीमनी जिंकलेले पैसे कुणीतरी तिसराच लंपास करतो. 

घटनेनंतर कुणी त्याच्या मागे धावतं, कुणी स्पर्धा घेणाऱ्या त्या दोघांकडे बघत राहतो. खरंतर जो तरुण पैसे घेऊन पळून जातो तो प्रश्न विचारणाऱ्या टीमचाच एक सदस्य आहे आणि हा एक प्रँक व्हिडिओ आहे, जो यू-ट्यूबवर खूप वायरल होतोय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.