Bhool Bhulaiyaa 3 : चित्रपटसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. 'भूल भुलैया 3' या चित्रपाटचे प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर रजत पोतदार यांचे आकस्मिक निधन झालं आहे. रजत यांनी बर्फी, फायटर, पठाण सारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. तर त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा हा निर्माता अनीस बज्मी यांनी केलं आहे. अनीज बज्नी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे. मात्र, अजूनही रजत पोतदार यांचे निधन कशामुळे झाले याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असणाऱ्या या प्रोडक्शन डिझायनरनं आणि आर्ट डायरेक्टर रजन पोतदारनं जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. अनीस बज्नी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की "आज मी एका खूप जवळच्या मित्राला गमावलं आहे. एकतर खूप चांगली व्यक्ती आणि एक मास्टर प्रोडक्शन डिझायनरला मी गमावलं. तू खूप लवकर गेला. तू नेहमीच आठवणीत राहशील. रजत दा"
हेही वाचा : 'देवरा'शी टक्कर तरी पहिल्याच दिवशी 'धर्मवीर 2'नं केली 'इतक्या' कोटींची कमाई
अनीस बज्नी यांनी News24 शी बोलताना प्रोडक्शन डिझायनरनं आणि आर्ट डायरेक्टर रजत पोतदार यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या दरम्यान, त्यानं सांगितलं की रजतला कोणतीही आरोग्यासंबंधीत समस्या नव्हती. त्याच्या निधनाच्या एक दिवस आधी रात्री त्या दोघांमध्ये बोलणं झालं होतं. अनीस बज्नीनं सांगितलं होतं की 'मला आश्चर्य झालं आहे. तो खूप चांगला व्यक्ती आणि प्रिय मित्र होता. रजत लंडनमध्ये होता आणि काल रात्रीचं आमचं बोलणं झालं होतं. त्यानं मला सांगितलं की त्याला 'भूल भुलैया 3' चा टीझर पसंतीस उतरला होता आणि त्यानं हे सगळ्यांना सांगण्यास देखील सांगितलं. खरंतर, त्यानं पुन्हा एकदा टीझरची एक स्टोरी पोस्ट केली होती.'