cooking gas

महागाईचा भडका, विनाअनुदानित गॅस महागला

 पेट्रोलच्या किंमतीत वाढ होऊन एक दिवस होत नाही तोच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती स्वयंपाक गॅस दरवाढ करण्यात आली आहे. 16.50 रुपये दराने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईचा आता भडका उडाला आहे.

Jul 1, 2014, 01:49 PM IST

साखरेनंतर गॅस सिलिंडर भडकणार

'अच्छे दिन आएंगे'ची स्वप्नं दाखवून दिल्ली काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महागाईचा आणखी एक कडू डोस देण्याच्या तयारीत आहे. साखरेनंतर आता गॅस सिलिंडरचा भडका उडण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2014, 03:35 PM IST

गुड न्यूजः घरगुती गॅस सिलेंडर दरात कपात

मोदी सरकारमध्ये अच्छे दिन आने वाले है याचा प्रत्यय आज देशातील कोट्यवधी गृहीणांना झाला. विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत २३ रुपये ५० पैशांनी करण्यात आली आहे. रुपया वधारल्यानं आयात किंमतीत घट झाली आहे. आणि त्यामुळं सिलेंडर दरात ही कपात करण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाच्या किंमतीत १.८ टक्क्यांनी कपात करण्यात आली.

Jun 2, 2014, 11:26 PM IST

खूशखबर! अनुदानीत सिलेंडरची संख्या ९ वरून १२!

निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.

Jan 30, 2014, 03:37 PM IST

गॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा ऑनलाईन

गॅस सिलिंडर पुरवणारी कंपनी किंवा वितरकावर नाखूश असलेल्या ग्राहकांना आता पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरूवातीला मुंबई, पुणे, नागपूरसह ३० शहरांमध्ये ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला आहे.

Oct 3, 2013, 03:41 PM IST

आता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार पेट्रोल पंपांवर

मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.

Oct 3, 2013, 08:32 AM IST