www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबतची सूचना केली त्यानंतर पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी तातडीनं त्यांच्या सूचनेची दखल घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्याची तयारी दाखवली होती आणि हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं प्रत्येक गॅसधारकाला आता वर्षाला सवलतीतील नऊ गॅस सिलेंडर मिळणार आहेत. त्यानंतरचा म्हणजे अकरावा सिलेंडर त्यांना बाजारभावानं विकत घ्यावा लागणार आहे.
अनुदानीत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची संख्या वाढवून १२ करण्यात आल्यामुळं सरकारवर गॅस सबसिडीच्या अनुदानाचा चार हजार कोटी रूपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. आधीच्या ९ गॅस सिलेंडरच्या अनुदानासाठी सरकारला प्रतिवर्षी ४६ हजार कोटी रूपयांचा खर्च येतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.