'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?

Sharad Pawar Called Nana Patekar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवारांनी नाना पाटेकरांना केला होता फोन अन् म्हणाले... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 27, 2024, 12:53 PM IST
'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर? title=
(Photo Credit : Social Media)

Sharad Pawar Called Nana Patekar Lok Sabha Election 2024 : अभिनेता नाना पाटेकर यांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टी नाही तर त्यासोबत बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही स्वत: चं स्थान निर्माण केलं. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. नेहमीच ते त्यांची मतं मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नानांनी अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यावेळी नाना पाटेकर यांनी खुलासा केला की त्यांना लोकसभेची ऑफर मिळाली होती. 

...मी जर पक्षाच्या अध्यक्षाला

नाना पाटेकर यांनी नुकतीच 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली होती. त्यावेळी नाना पाटेकर यांना विचारण्यात आलं की त्यांना कोणत्या लोकसभा निवडणूकीची ऑफर मिळाली होती का? त्यावर उत्तर देत नाना पाटेकर म्हणाले की "आतापर्यंत मला सगळ्या पक्षांच्या ऑफर आल्या होत्या. पण मी राजकारणात टिकू शकत नाही, कारण माझ्या मनात येईल ते मी बोलून मोकळा होतो. समजा पक्षाच्या अध्यक्षाला मी जर म्हणालो की 'तू पागल आहेस का?'  तर तो मला लगेच काढून टाकेल. मग राजकारणात जायचं कशाला?"

शरद पवारांनी केला होता कॉल...

लोकसभा निवडणूकीविषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की "मला लोकसभा निवडणुकीसाठी विचारण्यात आलं होतं. शरद पवारांनी मला फोन केला आणि विचारलं नाना तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहताय? मी त्यांना लगेच म्हणालो 'असं असतं तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं असतं.' मुळात मी लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहतोय हे मला त्यांच्याचकडून कळालं. कारण मला हे माहितच नव्हतं. मात्र, अशा अफवा या नेहमीच पसरत असतात."

काय होत्या चर्चा? 

नाना पाटेकर हे लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शिरुर मतदार संघातून निवडणकू लढणार असं म्हटलं जातं होतं. खरंतर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट हे त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. शिरुर मतदार संघाविषयी बोलायचं झालं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि ते विजेते ठरले. 

हेही वाचा : अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, देवी-देवतांच्या मुर्तीसह 'या' गोष्टींवर खिळली नजर

या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा सेटवरील एक किस्सा देखील सांगितला. 'हम दो' या शफी इनामदार दिग्दर्शित चित्रपटात नाना आणि ऋषी कपूर यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं. नाना पाटेकर यांनी या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितलं की ऋषी कपूर कोणत्याही सीनचा एकच टेक द्यायचे त्यानंतर त्यांना जर आणखी टेक द्यायला सांगितले तर ते चिडायचे. या सगळ्यात नाना आणि ऋषी कपूर यांच्यातील एक सीन तब्बल पाच वेळा शूट करण्यात आल्यानं ते नानानां फार शिव्या देत होते.