साखरेनंतर गॅस सिलिंडर भडकणार

'अच्छे दिन आएंगे'ची स्वप्नं दाखवून दिल्ली काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महागाईचा आणखी एक कडू डोस देण्याच्या तयारीत आहे. साखरेनंतर आता गॅस सिलिंडरचा भडका उडण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 24, 2014, 04:19 PM IST
 साखरेनंतर गॅस सिलिंडर भडकणार title=

नवी दिल्ली : 'अच्छे दिन आएंगे'ची स्वप्नं दाखवून दिल्ली काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महागाईचा आणखी एक कडू डोस देण्याच्या तयारीत आहे. साखरेनंतर आता गॅस सिलिंडरचा भडका उडण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची प्रत्येकी किमान 5 रुपये दरवाढ होण्याचे संकेत आहेत. मोदी यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री अरुण जेटली आणि पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी या मुद्द्यावर तब्बल पाच तास चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर रॉकेलच 1 रुपयांनी वाढ अपेक्षित आहे.

रेल्वे तिकिट, पास पाठोपाठ साखर महागली. क्विंटलमागे 60 रुपये वाढ झालेय. किलोला 6 रुपये दरवाढ झालेय. आता गॅस दरवाढीची निश्‍चित आहे. याच आठवड्यात ही भाववाढ होणार हे जवळपास निश्‍चित मानले जाते. नैसर्गिक वायूच्या दरांत प्रति ब्रिटिश थर्मल युनिटमागे 4.8 डॉलरवरून थेट 8.4 डॉलर इतकी वाढ होणे अपेक्षित असल्याने गॅस दरवाढ करावीच लागणार, याची चिन्हे आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.