www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोदी सरकारमध्ये अच्छे दिन आने वाले है याचा प्रत्यय आज देशातील कोट्यवधी गृहीणांना झाला. विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत २३ रुपये ५० पैशांनी करण्यात आली आहे. रुपया वधारल्यानं आयात किंमतीत घट झाली आहे. आणि त्यामुळं सिलेंडर दरात ही कपात करण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाच्या किंमतीत १.८ टक्क्यांनी कपात करण्यात आली.
दिल्लीमध्ये विना अनुदानीत एलपीजीचा दर ९०५ रुपये असणार आहे. यापूर्वी ही किंमत ९२६.५० रुपये होती. फेब्रुवारीपासून विना सब्सिडी सिलेंडरमधील ही पाचवी कपात आहे.
ग्राहकांना 12 अनुदानित सिलेंडर प्रती वर्षी देण्यात येतात आणि त्यानंतर त्यांना विनाअनुदानित सिलेंडर विकत घ्यावे लागतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.