bmc

पालिका कारभारावरुन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आलेली आहेत, पालिकेचा कारभार जसा व्हायला हवा तसा होत नाहीत, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधलाय. 

Dec 17, 2016, 12:51 PM IST

'मुंबई न तुंबल्याची दखल कोणीच घेतली नाही'

यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. याचबरोबर गेल्यावर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Dec 11, 2016, 08:07 PM IST

घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!

घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!

Dec 8, 2016, 10:22 PM IST

मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा पुढे आला आहे. कचरा वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे.कंत्राटदारानं कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा नंबर काय याची नोंद न करताच बिलं मंजूर करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

Dec 8, 2016, 04:34 PM IST

मुंबई नालेसफाई घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई महापालिका नालेसफाई घोटाळ्यात दोषारोप ठेऊन निलंबित करण्यात आलेल्य़ा 13 अधिका-यांवर अखेर पालिकेने प्रशासकीय कारवाई केली आहे. नालेसफाई कामांची चौकशी करणा-या कुकनूर समितीच्या अहवालातील अधिका-यांवरील खातेनिहाय कारवाईबाबतच्या शिफारसी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्विकारून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. वेतनवाढ कायमस्वरुपी रोखणे, पदावरून कमी करणे (पदावनत) तसेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर देय असलेली रक्कम वसूल करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

Dec 3, 2016, 04:47 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांसाठी खुशखबर

 मुंबई महापालिकेच्या निवडणूका दृष्टीपथात आल्यानं मुंबईला चकाचक बनवण्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीय...आचारसंहितेपूर्वीच महत्वाच्या कामांसाठी मंजूरी मिळवणं आणि ती कामं सुरु करणं हे लक्ष्य मुंबई महापालिका प्रशासनानं समोर ठेवलंय.

Nov 30, 2016, 10:08 PM IST

'मेट्रो ४'च्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांचा मुंबई दौरा

नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखलीय. 

Nov 30, 2016, 06:44 PM IST

घोटाळ्यात अडकलेले करणार मुंबईतल्या रस्त्यांची कामं

रस्ते घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांकडूनच उर्वरित रस्त्यांची कामं करून घेण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. 

Nov 24, 2016, 04:59 PM IST

'सुट्टे पैसे हवेत, तर माझ्याकडून घ्या'

'सुट्टे पैसे हवेत, तर माझ्याकडून घ्या' असं पालिकेच्या सभागृहात ओरडून म्हणणाऱ्या भाजपच्या गटनेत्याला हे वाक्य खूपच महागात पडणार असं दिसतंय.

Nov 19, 2016, 03:32 PM IST

म्हणून अजोय मेहतांनी मागितली कोर्टाची माफी

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज कोर्टाची विनाशर्त माफी मागितली आहे.

Nov 18, 2016, 09:32 PM IST

लिंकिंग रोडवरील दुकानांचे होणार स्थलांतर

शॉपिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध वांद्र्यातील लिंकिंग रोडवरील मार्केट लवकरच उठणार आहे. 

Nov 6, 2016, 03:07 PM IST

पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस

जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने ही नोटीस बजावली आहे.

Nov 3, 2016, 01:27 PM IST

ऐन दिवाळीत मुंबईत कचऱ्याचा ढीग

ऐन दिवाळीत विक्रोळी, पवई, नाहूर, भांडुप परिसरात कचरा उचलणाऱ्या पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. यामुळे या संपूर्ण विभागात कचराच कचरा दिसतो आहे.

Oct 29, 2016, 05:09 PM IST