baba ramdev

बाबा उद्या जाहीर करणार रणनीती

काळ्या पैशांच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेव यांनी आता आपण सोमवारी सकाळी रणनीती जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. आज सकाळीही त्यांनी पंतप्रधानांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता पण केंद्र सरकारपैकी कुणीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.

Aug 12, 2012, 09:10 PM IST

बाबांचा पंतप्रधानांना अल्टिमेटम

काळ्या पैशांच्या मुद्द्यावर बाबा रामदेव आक्रमक झाले आहेत. संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कारवाई करा, अशी मुदतच त्यांनी पंतप्रधानांना दिलीय. पंतप्रधान इमानदार असतील तर कारवा होईल अन्यथा उद्यापासून जनक्रांती होईल, असं वक्तव्य बाबांनी केलंय.

Aug 12, 2012, 05:11 PM IST

बाबा रामदेवांचा एल्गार

बाबा रामदेव पुन्हा एकदा रामलीला मैदानावरून सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्याधनाविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारला पूर्णवेळ दिला गेला होता. आज सायंकाळपर्यंत पंतप्रधानांनी कारवाई केली नाही तर महाक्रांती होईल, एल्गार बाबांनी रविवारी केला आहे.

Aug 12, 2012, 02:09 PM IST

बाबा रामदेवांचा केंद्राला अल्टिमेटम

बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांनी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता त्याची मुदत आज संपतीय. आपल्या मागण्यांवर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बाबा रामदेव यांनी दिलाय.

Aug 11, 2012, 11:38 AM IST

बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’

टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.

Aug 9, 2012, 04:04 PM IST

लोकपाल विधेयक मंजूर करा - बाबा रामदेव

जनलोकपालाचा अण्णांचा अजेंडा आता बाबा रामदेव यांनी आपल्या हाती घेतलाय. लोकपालाबाबत संशोधन होत राहिल मात्र विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी बाबा रामदेवांनी केलीय. तीन दिवस बाबांचं लाक्षणिक उपोषण असणार आहे. त्यानंतर ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत.

Aug 9, 2012, 04:01 PM IST

टीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'

आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.

Jul 27, 2012, 04:42 PM IST

'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.

Jul 26, 2012, 08:47 PM IST

अण्णा-बाबांचं जंतरमंतरवर उपोषण सुरू

योगगुरू बाबा रामदेव आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत. बाबा रामदेवांना पाठिंबा देत अण्णा हजारे जंतरमंतरवर होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाच्या ठिकाणी हजर होणार आहेत.

Jun 4, 2012, 03:17 PM IST

आमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे

मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती बाहेर जात असल्याच्या कारणावरून किंवा रामदेव बाबांवरून टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अण्णा म्हणालेत.

Apr 23, 2012, 02:18 PM IST

रामदेवांवरील पोलीस कारवाईचा आज फैसला

योग गुरू बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ४ जूनच्या मध्यरात्री केलेल्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2012, 01:38 PM IST

'बाबा-अण्णा' प्रचारासाठी एकत्र

भ्रष्टाचारविरोधातल्या लढाईत योग गुरू बाबा रामदेव आणि टीम अण्णा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २१ जानेवारीपासून टीम अण्णा आणि बाबा रामदेव एकत्रितपणे प्रचार सुरू करतील.

Jan 18, 2012, 02:01 PM IST

पूनमने उडवली बाबा रामदेवांची खिल्ली

सवंग लोकप्रियतेसाठी चर्चेत राहणाऱ्या मॉडेल पूनम पांडेने आता रामदेव बाबांची टर्र उडवली आहे. शनिवरी बाबा रामदेव यांच्या चेहऱ्यावर कामरान सिद्दिकीने काळी शाई फेकली होती.

Jan 16, 2012, 11:26 AM IST

"रामदेवांवरील हल्ल्यात संघाचा हात"- दिग्विजय सिंग

योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर काळी शाई फेकण्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप द्ग्विजय सिंग यांनी केला आहे. आणि शाई फेकण्याचं काम करणारा मनुष्य हा काँग्रेस विरोधक म्हणजेच भाजपशी संबंधित आहे.

Jan 15, 2012, 12:03 AM IST