www.24taas.com, नवी दिल्ली
भ्रष्टाचारविरोधातल्या लढाईत योग गुरू बाबा रामदेव आणि टीम अण्णा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २१ जानेवारीपासून टीम अण्णा आणि बाबा रामदेव एकत्रितपणे प्रचार सुरू करतील.
पाच राज्यांत होणारं मतदान लक्षात घेऊन टीम अण्णा आणि बाबा रामदेवांनी एकमेकांशी हातमिळवणी केली आहे. दोघे मिळून मतदारांना स्वच्छ चारित्र्याच्या आणि आचारविचारांच्या उमेदवारांना मत द्यावं यासाठी जागृतीचं काम करतील.मात्र दोघांपैकी कुणीही एका विशिष्ट पक्षासाठी व्होट मागणार नाही. टीम अण्णांचे सदस्य मनिष सिसोदिया यांनी बाबा रामदेव यांनी आपल्याबरोबर प्रचारात उतरावं यासाठी बोलणी केली होती. बाबा रामदेव यांनी या कार्यासाठी सहभागी होण्याचं मान्य केलं आहे.
बाबा रामदेव टीम अण्णासोबत प्रचाराला नक्की कुठे आणि कधी उतरतील हे अद्याप नक्की झालेलं नाही. टीम अण्णाने मात्र आधीच आपला निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम आधीच नक्की केला आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार २१ जानेवारीपासून उत्तराखंडाचील हरिव्दारमधून मतदार जागृती अभियानाला सुरूवात होईल. १२ फेब्रवारीपासून टीम अण्णांचे सदस्य उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागात जातील. बाबा रामदेव काळा पैसा भारतात परत आणावा यासाठी प्रयत्न करत आहेत, तर अण्णा भ्रष्टाचार विरोधी सशक्त लोकपाल यावं यासाठी प्रयत्नशील आहेत.