बाबा रामदेवांचा केंद्राला अल्टिमेटम

बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांनी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता त्याची मुदत आज संपतीय. आपल्या मागण्यांवर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बाबा रामदेव यांनी दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 11, 2012, 11:38 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांनी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता त्याची मुदत आज संपतीय. आपल्या मागण्यांवर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बाबा रामदेव यांनी दिलाय.
सरकारला त्यांना आज संध्याकाळपर्यंतची मुदत दिलीय. संध्याकाळपर्यंत सरकारनं योग्य प्रतिसाद दिला नाही तर क्रांतीचा उदघोषणा होईल असं बाबा रामदेव यांनी म्हंटलय. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि लोकपालच्या मुद्यावर बाबा रामदेव यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. यापूर्वी टीम अण्णांनीही काही दिवसांपूर्वीच जंतरमंतरवर उपोषण करून भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीची मागणी केली होती.
मात्र त्यांनतर टीम अण्णा विसर्जित करून राजकारण प्रवेशाचे संकेत अण्णा आणि त्यांच्या सहका-यांनी दिले. त्यानंतर आता बाबा रामदेव यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. आता सरकार यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणारय. भष्टा्चार आणि काळ्या पैशाच्या मुद्यावर सुरु असलेल्या आंदोलनातून रामदेव बाबांनी अखेर टार्गेट केलेच.
रामदेव बाबांनी पंतप्रधानांवर टीका करताना सांगितले की, परदेशातील काळा पैसा परत आणण्याससाठी पंतप्रधानांना राजकीय प्रामाणिकपणा आणि प्रबळ इच्छातशक्ती दाखविण्याची गरज आहे. तसेच देशाला प्रामाणिक पंतप्रधानांची गरज आहे.
काळ्या पैशाच्याक मुद्यावर रामदेव बाबा म्हेणाले, परदेशात काळा पैसा जमा करणा-यांची नावे सरकारकडे आहेत. आम्ही त्यां ना ओळखत नाही. परंतु, हा पैसा नेमका किती आहे, हे सांगण्यास काय हरकत आहे? हा पैसा देशात परत आल्याशस भारतीय सेना चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्तल शक्तीशाली बनू शकते.