आप नेते आशुतोष, शाझिया इल्मी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयाबाहेरील गोंधळ प्रकरणी आप नेते आशुतोष यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुधवारी भाजपच्या कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 6, 2014, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयाबाहेरील गोंधळ प्रकरणी आप नेते आशुतोष यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
बुधवारी भाजपच्या कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती.
या गोंधळाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आप नेते आशुतोष, शाझिया इल्मी आणि प्रो.आनंद यांच्यासह १७ जणांवर एफआयआर दाखल केली होती. यावेळी आशुतोष यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं आणि चौकशीत सहकार्य करणार असल्याचं आशुतोष यांनी म्हटलंय.
दरम्यान दिल्ली निवडणूक आयोगानं `आप`ला नोटीस बजावलीय. बुधवारी भाजप कार्यालयाबाहेरील गोंधळाप्रकरणी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. दिल्ली निवडणूक अधिकाऱ्यांनी याप्रकरणी रिपोर्ट तयार केला असून तो निवडणूक आयोगाला सोपवण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.