amit shah

अमित शहा दिल्लीकडे वळले, काँग्रेसचे दर्डा हिरमुसले...

भाजप नेते अमित शहा यांनी काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांची भेट टाळलीय आणि ते दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे, दर्डा यांचा चांगलाच हिरमूस झालेला दिसतोय.

Nov 15, 2014, 03:27 PM IST

केंद्रातल्या पदांच्या आमिषानं राज्यातली गणितं सुटणार?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. 

Nov 6, 2014, 10:42 PM IST

मोदी झाले भाजपाचे पहिले ऑनलाइन सदस्य

भाजपानं देशव्यापी सदस्य नोंदणीस शनिवारपासून सुरुवात केली. या सदस्य नोंदणीसाठी पक्षानं एक टोलफ्री टेलीफोन नंबर सुरू केला आहे. पक्ष मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचं उद्घाटन केलं आणि हातातील स्मार्टफोनवरून लगेच त्या नंबरवर फोन करून पक्षाचं पहिलं ऑनलाइन सदस्यत्वही घेतलं. 

Nov 2, 2014, 10:18 AM IST

शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता

शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.

Oct 31, 2014, 05:45 PM IST

देशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह

दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय. 

Oct 19, 2014, 05:40 PM IST

विदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?

विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.

Oct 19, 2014, 04:38 PM IST

युती तोडा ही अमित शहांची सूचना : रूडी

शिवसेना भाजपची पंचवीस वर्ष जुनी युती अशी अचानक कशी तुटली हा प्रश्न राज्यातील प्रत्येक माणसाला सतावत असतांना, शिवसेनेशी असलेली २५ वर्षांची युती तोडण्याची सूचना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच केली होती. त्यानुसार आम्ही युती तोडणारच होतो, असा गौप्यस्फोट पक्षाचे राज्याचे प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी केला आहे. 

Oct 13, 2014, 10:27 PM IST