नवी दिल्ली : भाजपानं देशव्यापी सदस्य नोंदणीस शनिवारपासून सुरुवात केली. या सदस्य नोंदणीसाठी पक्षानं एक टोलफ्री टेलीफोन नंबर सुरू केला आहे. पक्ष मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचं उद्घाटन केलं आणि हातातील स्मार्टफोनवरून लगेच त्या नंबरवर फोन करून पक्षाचं पहिलं ऑनलाइन सदस्यत्वही घेतलं.
त्यांच्या पाठोपाठ पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही त्या नंबरवरून ऑनलाइन सदस्यत्व घेतलं. भाजपाची ही सदस्य नोंदणी मोहीम ३१ मार्च २०१५पर्यंत सुरू राहणार आहे.
या नोंदणीद्वारे भापला मोठ्या प्रमाणात जनमत मिळणार आहे.
Let us join hands & make India stronger and more developed. Give a missed call on 18002662020 & join BJP. @BJP4India pic.twitter.com/UhjSqHyU6M
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.