alliance

औरंगाबादमध्ये युती कागदावरच, प्रत्यक्षात फुटीचं ग्रहण

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास नेतेमंडळी व्यक्त करतायत. 

Apr 8, 2015, 10:32 AM IST

नवी मुंबईतही युती होणार, ६८-४३चा फॉर्म्युला ठरला

नवी मुंबईत शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आलीय. दोन्ही पक्षांमध्ये ६८-४३ च्या फॉर्मुल्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना ६८ जागा तर भाजप ४३ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय.

Apr 6, 2015, 10:41 AM IST

महापालिका निवडणुकीत सेना-भाजप युती होणारच - दानवे

औरंगाबादमध्ये सेना-भाजप युती होणारच अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी झी मीडियाला दिलेय. आज संध्याकाळपर्यंत युतीबाबत निर्णय होईल अशी माहिती दानवेंनी झी मीडियाला दिलीय. 

Apr 5, 2015, 02:46 PM IST

महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी - उद्धव ठाकरे

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय. मात्र याबाबतचा निर्णय़ भाजपनंच घ्यावा असं सांगत उद्धव ठाकरेंनी युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवलाय. 

Mar 24, 2015, 09:38 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती'

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपा आणि पीडीपीचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७९ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासह २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

Mar 1, 2015, 04:17 PM IST

भाजपची शिवसेनेला ४ कॅबिनेट, ७ राज्यमंत्रीपदाची ऑफर

भाजपनं शिवसेनेला ४ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची आज आणखी एक फेरी होणार आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची चर्चा सकारात्मक सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत. 

Dec 1, 2014, 01:54 PM IST

चर्चेचं गुऱ्हाळ: सेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास भाजप तयार - सूत्र

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा चर्चा सुरू झालीय. भाजप शिवसेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Dec 1, 2014, 09:11 AM IST