महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी - उद्धव ठाकरे

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय. मात्र याबाबतचा निर्णय़ भाजपनंच घ्यावा असं सांगत उद्धव ठाकरेंनी युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवलाय. 

Updated: Mar 24, 2015, 10:29 PM IST
महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी  - उद्धव ठाकरे  title=

मुंबई/औरंगाबाद: नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय. मात्र याबाबतचा निर्णय़ भाजपनंच घ्यावा असं सांगत उद्धव ठाकरेंनी युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवलाय. 

औरंगाबादमधील परिस्थिती -

औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला... महापालिकेत गेली २० वर्ष शिवसेनेचं अधिराज्य कायम आहे. अनेक वर्ष या शहरात वर्चस्व टिकवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं मारलेली जोरदार मुसंडी हे याचं प्रमुख कारण आहे. त्यामुळं औरंगाबादेत यावेळी युती होणं सध्यातरी थोडं कठीणच आहे.  

२०१० महापालिका निवडणुकीत ६०-४० असा फार्म्युला होता. त्यानुसार शिवसेनेनं ५९ जागा लढवून ३० जागांवर विजय मिळवला तर भाजपनं ३८ जागा लढवून १५ जागांवर विजय मिळवला... भाजप यावेळी ५०-५० फॉर्म्युलाची मागणी करतंय. तर शिवसेनेनं ५५-४५ असा नवा फार्म्युला समोर केलाय. त्यामुळे बॉल आता भाजपच्या कोर्टात आहे.

भाजपची वाढती ताकद पाहता युतीच्या भल्यासाठी शिवसेनेनं ५०-५० चा फार्म्युला मान्य करावा असं भाजप म्हणतंय. शिवसेनेचे ४ नगरसेवक तर काँग्रेसमधूनही ४ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अनेक कार्यकर्तेही भाजपात आलेत. त्यामुळं त्यांना जागा सोडायच्या असतील तर भाजपला अर्ध्या जागा मिळवाव्याच लागतील. तर भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेना कुठल्याही परिस्थितीत जागा सोडणार नाही. येत्या दोन दिवसांत युती आणि जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतरच युतीच्या भवितव्याचा निर्णय होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.