हार्बर रेल्वे

मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवरील सहा मार्गावर उद्या रात्री पावणेबारापासून जवळपास आठ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल. 

Dec 17, 2015, 02:30 PM IST

हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, गाड्या लेट

हार्बर रेल्वे मार्गावर वडाळ्याजवळ मालगाडी बंद पडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत होती. या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.

Nov 23, 2015, 09:17 AM IST

सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली

मंगळवारी सकाळी ऑफिसला निघायच्या घाई-गरबडीतच हार्बर रेल्वे बोंबलली. सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

Sep 1, 2015, 09:01 AM IST

हार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा उपाय...

हार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा उपाय... 

Jan 13, 2015, 11:01 AM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय. 

Sep 3, 2014, 12:41 PM IST

मुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर लेट, ट्रॅफिक जॅम

 मुंबई आणि उपनगराला आज सकाळपासून जोरदार पावसाने झोडपले असून सततच्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने धावत असून ठिकठिकाणी तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. 

Jul 31, 2014, 12:20 PM IST

मुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर रेल्वे उशिरा

मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा मुंबई लोकलला फटका बसला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिरांने धावत आहे. तर डहाणू येथे पावसाच कहर सुरु आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती आहे.

Jul 31, 2014, 09:16 AM IST

हार्बर रेल्वेला सापत्न वागणूक

 मध्य रेल्वेचे सावत्र अपत्य अशीच हार्बर रेल्वेची ओळख आहे. कारण रेल्वेमध्ये ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध होतात, त्या सगळ्यात शेवटी हार्बरकडे पोहचतात अशी अवघड परिस्थिती आहे.

Jul 8, 2014, 07:50 AM IST

४५ मिनिटानंतर रेल्वे सुरू, मध्य-हार्बर मार्गावर तुफान गर्दी

मुंबई - मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटांपासून ठप्प आहे. त्यामुळे सीएसटी येथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मोटरमन आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वादामुळे रेल्वे ठप्प होती. ही वाहतूक ४५ मिनिटानंतर सुरू झालेय. मात्र, तुफान गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत..

Jan 10, 2014, 07:32 PM IST

हार्बर रेल्वे सेवा सुरळीत

मालगाडीचे डबे घसरल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. कुर्ला स्थानकाजवळ मालगाडीचे तीन डबे घसरल्याने या मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.

Aug 28, 2013, 02:29 PM IST