हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, गाड्या लेट

हार्बर रेल्वे मार्गावर वडाळ्याजवळ मालगाडी बंद पडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत होती. या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.

Updated: Nov 23, 2015, 09:17 AM IST
हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, गाड्या लेट title=

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर वडाळ्याजवळ मालगाडी बंद पडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत होती. या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.

पनवेलकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांवर मोठा परिणाम झालाय. अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरून मिळेल त्या वाहनाने ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळपासून वडाळ्याजवळ ही मालगाडी घसरली. तेव्हापासून वाहतुकीचे मुंबईकडे येणारी वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरू आहे. ती अद्याप सुरळीत झालेली नाही. मालागडी बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.