...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक

सीएसटी स्थानकावर १२ डब्यांच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Jan 29, 2016, 09:49 AM IST
...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक title=

मुंबई : सीएसटी स्थानकावर १२ डब्यांच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

१२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळात हार्बर मार्गावरूल वाहतूक बंद राहील. मात्र, मुख्य मार्गावरील वाहतुकीत कुठलाही बदल होणार नाही.

या काळात हार्बर मार्गावरील सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या केवळ वडाळ्यापर्यंतच धावणार आहेत. 

हार्बर मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत १२ डब्यांच्या गाड्याची योजना एमयूटीपी-२मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या मार्गावरील प्लॅटफॉर्म लांबी वाढवण्याचं काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरु आहे.