मुंबई : मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा मुंबई लोकलला फटका बसला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिरांने धावत आहे. तर डहाणू येथे पावसाच कहर सुरु आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती आहे.
बोरीवली ते दादर दरम्यान पाऊस सुरु आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोद दिसून येत आहे. मुंबईतील रस्ते वाहतूकही मंद गतीने सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून पालघर आणि डहाणू परिसरात पावसाचा कहर सरुच आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने सुर्या आणि वैतरणा नदीला पूर आलाय. सूर्या नदीवरील मासवण पूल काल सकाळपासूनच पाण्याखाली आहे. त्यामुळे या भागातील वाहतूकही ठप्प आहे.
पुरामुळे आसपासच्या अनेक गावांशी पालघरचा संपर्क तुलटा असून पालघर-डहाणू शहरातील अनेक सखल भागात पाणी भरले आहे. त्यामुळे बाजारपेठाही बंद आहेत. रात्रभरही पावसाचा जोर कायम होता त्यामुळे नागरिकांची झोपही उडाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.