हरियाणा

महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.

Sep 12, 2014, 04:46 PM IST

भाजपची सत्ता आल्यावर बिहारी मुलींशी लग्न लावून देऊ

'हरियाणामध्ये भाजप सत्तेत आली तर राज्यातील तरुणांची लग्न बिहारी मुलींशी लावून देऊ. हरियाणातील एकाही तरूणाला लग्नाशिवाय राहू देणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश धनखड यांनी केलंय. या वक्तव्यानंतर धनखड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतेय. 

Jul 6, 2014, 10:03 PM IST

महिलांना ‘डीजे’वर नाचण्यास मनाई

जिथं एकीकडे महिला प्रगतीपथावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायेत. तिथं काही महिलांवर आजही अनेक निर्बंध लादले जात आहेत.

Jun 30, 2014, 11:25 AM IST

जळगावातल्या तरुणीवर हरियाणात गँगरेप!

हरियाणाच्या कॅथल जिल्ह्यातील क्षेत्र पुंडरी या भागात रविवारी सकाळी एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तरुणीला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. यावेळी, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलंय. ही तरुणी मूळची महाराष्ट्रातली असल्याचं समोर येतंय.

May 5, 2014, 01:03 PM IST

महिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक

हरियाणाच्या आरोग्यमंत्री किरण चौधरी यांच्यावर नारनौल येथील प्रचार सभेत दडगफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना तात्काळ गुरवागमधील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Mar 20, 2014, 09:54 AM IST

हरियाणाचा क्रिकेटर संदीप सिंहचा अपघाती मृत्यू

हरियाणाचा प्रथम श्रेणीचा २५ वर्षीय क्रिकेटर संदीप सिंह याचा शुक्रवारी एका अपघातात मृत्यू झाला. हरियाणातील मुंडाल इथं ही दु्र्घटना घडली. ट्रॅक्टरखाली चिरडला गेल्यानं संदीपचा मृत्यू झाला.

Feb 8, 2014, 03:00 PM IST

हरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले

एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.

Feb 2, 2014, 11:18 PM IST

बायकोनं नवऱ्याला छतावरून फेकलं!

अवैध संबंधासाठी एका पत्नीनं स्वत:च्या पतीला जीवे मारण्याच्या उद्देशानं छतावरून फेकलं. यामध्ये पती थोडक्यात बचावला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी पत्नी, तिचा भाऊ, आई आणि तिचा प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Jan 14, 2014, 03:31 PM IST

<B> <font color=red> व्हिडिओ : </font></b> पोलीस स्टेशनमध्ये डिस्को...

पोलीस स्टेशनमध्ये डिस्को... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. पोलीस स्टेशनमध्ये डीस्कोचा प्रकार घडलाय हरियाणामध्ये…

Dec 30, 2013, 12:03 PM IST

नवऱ्याला कॉटला बांधून महिलेवर अत्याचार

हरियाणा राज्यातील रेवाडीपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हा प्रकार ऐकल्यावर अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. दहा जणांच्या टोळीनं रेवाडी शहराच्या बाहेर राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

Dec 29, 2013, 05:09 PM IST

भेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला!

हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जाईल.

Sep 22, 2013, 12:57 PM IST

हॉरर किलिंग... प्रेमी युगुलाची कुटुंबीयांकडूनच क्रूर हत्या!

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

Sep 19, 2013, 10:05 AM IST

नरेंद्र मोदींचा हरियाणातून `श्रीगणेशा`

भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची हरियाणाच्या रेवार इथं जाहिर सभा होतेय.

Sep 15, 2013, 01:26 PM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आईची हत्या

देशात सामूहिक बलात्काराच्या अनेक घटना सध्या पुढं येत आहेत. महिलांच्या बाबतीत नेहमीच वादात येणाऱ्या हरियाणा राज्यातल्या चोटीकलासी गावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. मात्र एवढ्यावरच न थांबता मुलीच्या आईचीही नराधमांनी हत्या केली. हे कृत्य करणारे होते त्याच गावातल्या प्रभावशाली घराण्यांतील मुलं.

Aug 29, 2013, 02:48 PM IST