www.24taas.com झी मीडीया, हरियाणा
हरियाणाचा प्रथम श्रेणीचा २५ वर्षीय क्रिकेटर संदीप सिंह याचा शुक्रवारी एका अपघातात मृत्यू झाला. हरियाणातील मुंडाल इथं ही दु्र्घटना घडली. ट्रॅक्टरखाली चिरडला गेल्यानं संदीपचा मृत्यू झाला.
संदीप त्याच्या गावी होणाऱ्या फुटबॉल टुर्नामेंटसाठी मैदानाच्या सपाटीकरणासाठी मदत करत होता. अचानकपणे ट्रॅक्टर घसरला आणि ट्रक्टर खाली सापडून संदीपचा दुर्देवी मृत्यू झाला.
या हंगामात संदीपचा समावेश राखीव खेळाडूंच्या यादीत करण्यात आला होता. हरियाणाकडून खेळताना १५ प्रथम श्रेणी, ११ अ गटातील , १६ टि-ट्वेंटी सामने खेळले होते. त्याने शेवटचा सामना २०१२मध्ये बडौद्याच्या लाहिली इथं खेळला होता.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आणि हरियाणा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले अनिरूद्ध चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप हा एक गुणी खेळाडू होता. संदीपच्या जाण्यानं कधीही भरून निघणार नाही, अशी हानी झाली आहे. आम्ही एका उद्योन्मुख खेळाडूला मुकलोय, अशा भावना अनिरूद्ध चौधरी यांनी व्यक्त केली. संदीपच्या अचानक जाण्यानं त्याच्या हरियाणा क्रिकेट संघातील सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.