सुप्रीम कोर्ट

भारत-इंग्लड पहिल्या कसोटीवरील संकट दूर

 उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत वि इंग्लंड कसोटीवरील संकट टळलेय. सुप्रीम कोर्टाने राजकोट कसोटीसाठी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यास परवानगी दिलीये.

Nov 8, 2016, 04:46 PM IST

दिल्ली प्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

 दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून गठित प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलंय. याबाबत मंडळाने कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती केली. 

Nov 8, 2016, 11:56 AM IST

कंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतका पगार द्या - सुप्रीम कोर्ट

 कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिलीये. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. 

Oct 28, 2016, 07:33 PM IST

बीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी

राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

Oct 21, 2016, 04:09 PM IST

'धर्मगुरूं'वर कारवाई करता येईल का? - सुप्रीम कोर्ट

धर्मगुरूंचा त्या त्या धर्मावर चांगला पगडा असतो. त्यामुळे धर्मगुरूंनी केलेल्या आवाहनाचा राजकारणात राजकीय नेत्यांना चांगला लाभ मिळतो. निवडणूकीत धर्मगुरूंनी एखाद्या उमेदवारासाठी मतदान करण्याचे आवाहन केले तर धर्मगुरूंना जबाबदार ठरवण्यात येते का? त्यांच्यावर कारवाई करता येईल का? यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. धर्मगुरूंवर कोणत्या नियमांतर्गत कारवाई करता येईल, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला आहे.

Oct 20, 2016, 11:27 AM IST

सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढणार, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

१८ वर्षापूर्वीचं जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेल्या सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात एक विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. जोधपूर हायकोर्टाने २५ जुलैला सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. राज्य सरकारने तेव्हाच म्हटलं होतं की ते या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार.

Oct 18, 2016, 06:29 PM IST

लोढा समितीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला

सुप्रीम कोर्टानं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा दिला आहे.

Oct 17, 2016, 05:56 PM IST

सुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला अल्टिमेटम

लोढा समितीनं दिलेल्या शिफारसी लागू करू असं लेखी आश्वासन देण्याची सक्ती सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयवर केली आहे.

Oct 6, 2016, 04:05 PM IST

लोढा समितीच्या अनेक शिफारशी बीसीसीआयनं फेटाळल्या

लोढा समितीने सुचविलेल्या सुधारणावर आज बीसीसीआय सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे.

Oct 6, 2016, 11:16 AM IST

मुलांच्या मृत्यूनं सरकारला काहीच फरक पडत नाही - सर्वोच्च न्यायालय संतापलं

मुलांच्या मरणानं महाराष्ट्र सरकारला कुठलाही फरक पडत नाही. सरकारला त्याची चिंता नाही, असं अत्यंत तिखट निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय.

Oct 5, 2016, 06:56 PM IST