सुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला अल्टिमेटम

लोढा समितीनं दिलेल्या शिफारसी लागू करू असं लेखी आश्वासन देण्याची सक्ती सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयवर केली आहे.

Updated: Oct 6, 2016, 04:05 PM IST
सुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला अल्टिमेटम title=

नवी दिल्ली : लोढा समितीनं दिलेल्या शिफारसी लागू करू असं लेखी आश्वासन देण्याची सक्ती सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयवर केली आहे. तुम्ही लेखी आश्वासन दिलं नाहीतर आम्ही लेखी आश्वासन काढू, असं अल्टिमेटम सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिलं. ज्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करायच्या नाहीत अशा राज्य क्रिकेट बोर्डांना कुठलही आर्थिक रसद पुरवू नका असंही सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दरडावलं आहे.

आज सकाळी बीसीसीआयनं लोढा समितीच्या शिफारसींविषयी तीव्र नाराजी व्यक्त करणारं उत्तर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं. त्यात लोढा समितीच्या शिफारसींपैकी अनेक शिफारसी मान्य नसल्याचं सांगण्यात आलं. त्या शिफारसी लागू न करण्याबाबत बोर्डाच्या विशेष बैठकीत मतदान करून ठराव केल्याचं बीसीसीआयनं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयालयाचं या उत्तरानं समाधान झालं नाही. याप्रकरणी आता उद्या अंतिम सुनावणी होणार आहे.