नवी दिल्ली : १८ वर्षापूर्वीचं जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेल्या सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात एक विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. जोधपूर हायकोर्टाने २५ जुलैला सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. राज्य सरकारने तेव्हाच म्हटलं होतं की ते या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार.
या प्रकरणात अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल आणि वन आणि पर्यावरण विभागाने विशेष याचिका दाखल करण्यासाठी परवानगी मागितली होती. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचे अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल शिवमंगल शर्मा यांनी म्हटलं की, सलमान खान प्रकरणात एसएलपी सुप्रीम कोर्टात दाखल केली गेली आहे. पण मध्ये काही सुट्ट्या आल्याने सुनावणीची तारीख ठरली नाही. पुढील आठवड्यात किंवा दिवाळीनंतर याप्रकरणावर सुनावणी होऊ शकते.