सुनील गावस्कर

गावस्करांनी उघड केले बिग बीचे गुपीत, तेंडुलकरही हैराण!

 मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात काल आयपीएलचा ५१ वा सामना खेळविण्यात आला. यावेळी तीन महान दिग्गज एकत्र आले होते. महान क्रिकेटर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांना मॅच दरम्यान एकत्र पाहण्याचा अनुभव कोट्यवधी भारतीयांनी घेतला. 

May 15, 2015, 06:02 PM IST

भारतीय क्रिकेटपटूंमुळं देशाची मान शरमेनं झुकली - सुनील गावस्कर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं भारताची मान शरमेनं झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी टेस्ट संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे.  

Aug 18, 2014, 01:34 PM IST

गावस्करांचा मोठा खुलासा, यंदाही सट्टेबाजांनी केला होता दोघांशी संपर्क

आयपीएलमध्ये सट्टेबाजांनी दोघा क्रिकेटरांशी संपर्क केला असल्याचा खळबळजनक खुलासा बीसीसीआय हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी केला आहे. याची माहिती भ्रष्टाचार निरोधक आणि सुरक्षा पथकाला अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

May 22, 2014, 09:07 PM IST

`एचडीएफसी` अध्यक्ष दीपक पारिख आयपीएलचे विशेष सल्लागार

बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.

Apr 12, 2014, 02:42 PM IST

आयपीएल : चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्सला दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानाही आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही संघाना दिलासा मिळाला आहे.

Mar 28, 2014, 01:32 PM IST

सुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष

बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या कोणत्याही सामन्यावर आणि खेळाडूवर बंदी असणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सत्र सुरळीत पार पडणार आहे.

Mar 28, 2014, 11:34 AM IST

बीसीसाआयच्या खुर्चीला गावस्करांचा सकारात्मक प्रतिसाद

बीसीसाआय तसंच आयपीएल स्पर्धेसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपद स्विकारण्याबाबत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

Mar 28, 2014, 09:24 AM IST

`तो` टीममध्ये असेपर्यंत टीम इंडियाचा पराभव - गावस्कर

भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पराभवावर इशारा दिला आहे.

Mar 11, 2014, 10:19 AM IST

सेनेला हवाय गावसकर.... सचिन नकोसा!

मुंबईतील कांदिवली संकुलाला सचिन तेंडुलकरचं नाव देण्याच्या प्रस्तावाला राजकीय वळण मिळालंय. सचिनचं नाव देण्याची घोषणा ‘एमसीए’ अध्यक्ष शरद पवार यांनी काल केली तर हा पालिकेचा भूखंड असल्यानं हा अधिकार महापालिकेचाच असल्याचं सत्ताधारी शिवसेनेनं सांगून प्रकरणाला नवं वळण दिलंय.

Oct 23, 2013, 06:38 PM IST

सचिननंतर आता टार्गेट धोनी...

इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला हटवण्याची मागणी जोर धरू लागलीय. एकानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीवर चांगलीच टीका होतेय.

Dec 18, 2012, 10:26 AM IST

सुनील गावस्कर पाकिस्तानच्या मदतीला...

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सुनील गावस्कर आता प्रस्तावित पाकिस्तान प्रीमियर लीग ट्वेंटी-२० टूर्नामेंटच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मदत करणार आहे. पीसीबीनं पाठवलेलं पाकिस्तान भेटीचं आमंत्रण गावस्कर यांनी स्वीकारलंय.

Oct 4, 2012, 08:31 AM IST

सचिनच्या खेळावर वयाचा परिणाम – गावस्कर

भारतीय टीमचे माजी कॅप्टन सुनील गावस्करनी सचिनच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे. सचिनच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम होत असल्याचं मत गावस्करांनी यावेळी म्हटलंय.

Sep 1, 2012, 08:41 PM IST

भारत-पाक मालिकेला गावस्करांचा विरोध

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तान सहकार्य करत नसताना पाकिस्तानसोबत वन डे मालिका खेळविण्यास माजी कसोटी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध केला आहे. मुंबई हल्लाच्या तपासात पाकचे सहकार्य नसताना अशी मालिका खेळविण्यावर गावस्कर यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Jul 16, 2012, 08:19 PM IST

गावस्करांचे भारतीय खेळाडूंवर ताशेरे

माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Jan 6, 2012, 11:37 PM IST