'कोहली काळोखातही बॅटिंग करु शकतो'

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तोंडभरुन कौतुक केलेय. 

Updated: Jan 30, 2016, 01:21 PM IST
 'कोहली काळोखातही बॅटिंग करु शकतो' title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तोंडभरुन कौतुक केलेय. विराट ज्याप्रमाणे फॉर्ममध्ये आहे त्याप्रमाणे तो अर्ध्या रात्री काळोखातही बॅटिंग करु शकेल,अशा शब्दात त्यांनी विराटची स्तुती केलीय.

 

त्याने भविष्यातील क्रिकेटपटूंसाठी एक मानदंड तयार केलेत. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याचा फॉर्म पाहता तो अंधारातही फलंदाजी करु शकतो. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याला बाद करण्यात अपयशी ठरतायत, असे गावस्करांनी म्हटलेय. 

यावेळी तुम्हाल रोहित आणि विराट यापैकी कोणाला गोलंदाजी करायला आवडेल असे विचारले असता गावस्कर म्हणाले, या दोघांपैकी एकालाही नाही. दोघेही असे फलंदाज आहेत की तुम्ही कशीही गोलंदाजी करा ते प्रत्येक बॉलवर कसा फटका मारता येईल याचा विचार करतात. त्यामुळे मी कोणालाही गोलंदाजी करणार नाही.