www.24taas.com, झी मीडिया, नई दिल्ली
बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.
आर्थिक व्यवहारांमध्ये चांगलाच अनुभव असलेले पारिख हे `आईपीएल`च्या कामात गावस्कर यांना मदत करतील. पारीख यांनी आर्थिक संकटाच्या काळात सरकारचीदेखील मदत केली होती. २००९ साली पारीख यांनी `सत्यम बोर्डा`चे विशेष सल्लागार म्हणून देखील काम केलंय. या काळात त्यांनी पुन्हा एकदा `सत्यम` कंपनीबाबात लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यश मिळवलं होतं. या कामाबद्दल त्यांचं कौतुकही झालं होतं.
पारीख सुरुवातीपासूनच विविध क्षेत्रात रणनिती तयार करण्यात मदत करत होते. त्यांनी सरकारला विविध गोष्टींबाबत कठोर निर्णय घेण्याचा सल्लादेखील दिला. ते विविध आर्थिक समूह, सरकारद्वारे नियुक्त सल्लागार समिती आणि कार्यदलांचे सदस्य म्हणून काम पाहिलंय. त्यामुळे त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलंय.
`बीसीसीआय`चा प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल गावस्कर यांनी आनंद व्यक्त केलाय. `दीपक आता आयपीएल संचालक परिषदेला विशेष सल्लागार म्हणून मदत करणार आहे. मला, आनंद आहे की त्यांनी माझा हा प्रस्ताव स्वीकारला` असं गावस्कर यांनी म्हटलंय.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत एन. श्रीनिवासन यांना अध्यक्ष पदापासून दूर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. एन. श्रीनिवासन यांच्या जागी अंतरिम अध्यक्ष म्हणून सुनील गावस्कर यांनी धुरा सांभाळलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.