गावस्करांनी उघड केले बिग बीचे गुपीत, तेंडुलकरही हैराण!

 मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात काल आयपीएलचा ५१ वा सामना खेळविण्यात आला. यावेळी तीन महान दिग्गज एकत्र आले होते. महान क्रिकेटर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांना मॅच दरम्यान एकत्र पाहण्याचा अनुभव कोट्यवधी भारतीयांनी घेतला. 

Updated: May 16, 2015, 11:53 AM IST
गावस्करांनी उघड केले बिग बीचे गुपीत, तेंडुलकरही हैराण! title=
सौजन्य - फेसबूक

मुंबई :  मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात काल आयपीएलचा ५१ वा सामना खेळविण्यात आला. यावेळी तीन महान दिग्गज एकत्र आले होते. महान क्रिकेटर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांना मॅच दरम्यान एकत्र पाहण्याचा अनुभव कोट्यवधी भारतीयांनी घेतला. 

कॉमेंट्री करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी 'बिग बी' यांना पाहिल्यावर ते तेंडुलकरला घेऊन त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेले. मुंबईकर सनी गावस्कर आणि बिग बी यांचा जुना 'याराना' आहे. अनेक चटपटीत गोष्टी झाल्या पण बिग बी यांच्या चाहत्यांसाठी सुनील गावस्कर यांनी एक मोठी ब्रेकिंग न्यूज दिली. 

गावस्कर यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन हे पूर्वी चॅरेटी मॅच खेळायचे. ते डावखुऱ्या हाताने मध्य गती गोलंदाजी करीत होते. हे ऐकून सचिनलाही आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मला माहित असते तर मलाही त्यांची गोलंदाजी खेळायला आवडली असती. 

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक सामन्याची हिंदीत कॉमेंट्री केली होती. अमिताभ 'पीकू' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या टीम सोबत स्टेडिअममध्ये आले होते. त्याच्यासोबत दीपिका पदुकोणही होती. 

गावस्करांच्या प्रश्नावर क्लिन बोल्ड 
कोन बनेगा करोडपतीमध्ये टीव्हीतील प्रेक्षकांना प्रश्नावर प्रश्न विचारणाऱ्या अमिताभ बच्चन यांना गावस्कर यांनी प्रश्न विचारून क्लिन बोल्ड केले. गावस्कर यांनी विचारले की, कोलकता आणि मुंबईच्या सामन्यात कोणाला पाठिंबा देणार ?  अमिताभ यांनी सांगितले की, खूप कठीण प्रश्न आहे. कोलकताचा मी जावई आहे. आणि मुंबई राहतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.