गावस्करांचे भारतीय खेळाडूंवर ताशेरे

माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Updated: Jan 6, 2012, 11:37 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय खेळाडूंच्या सरावाकडे पाहण्याच्या दृष्टीकोना विषयी गावस्करांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

ख्रिसमस ऑस्ट्रेलियातील मोठा सण आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू पहिल्या कसोटी नंतर त्यात सहभागी झाले तर समजू शकतं. पण आपल्या खेळाडूंचा त्याच्याशी काय संबंध, ते सराव का करत नव्हते?  ते ऑस्ट्रेलिया पाहण्यासाठी गेले आहेत का क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत असा सवालच गावस्करांनी विचारला आहे. पहिली कसोटी चौथ्या दिवशी संपली आणि त्यांनी पाचव्या दिवशी सुट्टी घेतली तर समजु शकतं पण त्यानंतर त्यांनी सराव का केला नाही. खेळाडूंचा खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीर नाही. आणि दौऱ्यावर असताना त्यांनी फक्त सराव, सराव आणि सरावच केला पाहिजे. आणि त्या संदर्भात कोणी प्रश्न का विचारत नाही. हे प्रश्न कोणीतरी विचारले पाहिजे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही कसोटीत भारताचा दारुण पराभव केला.