भारतीय क्रिकेटपटूंमुळं देशाची मान शरमेनं झुकली - सुनील गावस्कर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं भारताची मान शरमेनं झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी टेस्ट संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे.  

Updated: Aug 18, 2014, 01:34 PM IST
भारतीय क्रिकेटपटूंमुळं देशाची मान शरमेनं झुकली - सुनील गावस्कर title=

नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं भारताची मान शरमेनं झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी टेस्ट संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे.  

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं १-३ अशी गमावल्यानं चहुबाजूंनी भारतीय संघावर टीका होत आहे. ओल्ड ट्रॅफर्डपाठोपाठ भारतीय संघानं ओव्हलमध्ये अत्यंत खराब कामगिरी केल्यानं पाचव्या कसोटी सामन्यातही भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. 

भारताच्या या खराब कामगिरीबाबत बोलताना सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमात भारतीय संघाला कठोर शब्दांत फटकारलं. 'जर तुम्हाला देशासाठी टेस्ट मॅचेस खेळायची इच्छा नसेल तर संघातून बाहेर पडा, फक्त मर्यादित ओव्हरच्याच मॅच खेळा. खराब कामगिरी करून तुम्ही देशाची मान झुकवली आहे, हे योग्य नाही' अशा कठोर शब्दांत त्यांनी धोनी आणि टीमवर टीका केली. 

या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी इंग्लंडच्या संघाचं कौतुकही केली. 'या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंड संघाची कामगिरी प्रत्येक बाबतीत सरस होती. मात्र असं असलं तरीही त्यांनी या विजयानं हुरळून जाता कामा नये, कारण यापुढं त्यांचीही टेस्ट असेल' असं गावस्कर म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.