सचिनच्या खेळावर वयाचा परिणाम – गावस्कर

भारतीय टीमचे माजी कॅप्टन सुनील गावस्करनी सचिनच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे. सचिनच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम होत असल्याचं मत गावस्करांनी यावेळी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 1, 2012, 08:41 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय टीमचे माजी कॅप्टन सुनील गावस्करनी सचिनच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे. सचिनच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम होत असल्याचं मत गावस्करांनी यावेळी म्हटलंय.
सचिन बंगळुरु टेस्टमध्ये क्लिन बोल्ड झाल्यानंतर गावस्करांनी त्याच्यावर ही टीका केली आहे. सुनिल गावस्करबरोबर संजय मांजरेकरनही सचिनच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे. सचिन १९० टेस्टमध्ये तब्बल ५० वेळा क्लीन बोल्ड झाला आहे. आणि त्यामुळेच त्याच्या फुटवर्कबाबत माजी क्रिकेटपटूंनी हल्लाबोल केला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड बंगळुरु टेस्टमध्ये आज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्लिन बोल्ड झाला. डग ब्रेसवेलनं त्याला १७ रन्सवर बोल्ड केलं. मास्टर-ब्लास्टर सातत्यानं बोल्ड होतोय. त्यामुळे भारतीय गोटात सध्या चिंतेचं वातावरण आहे. सचिनचं बचाव भेदणं प्रतिस्प्रधी बॉलर्ससाठी नेहमीच आव्हानात्मक असायचं. मात्र, सचिन सातत्यानं बोल्ड झाल्यामुळे त्याचा बचाव आता प्रतिस्पर्धी बॉलर्स सहज भेदतायत. बंगळुरु टेस्टमध्येही सचिनला बोल्ड करण्यात किवी बॉलरला यश मिळालं होतं.