सरकार

हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे

 हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो

Feb 15, 2017, 03:17 PM IST

राज्य सरकारचा टेकू कधी काढणार याबद्दल बोलले उद्धव...

 युती तुटली म्हणून मी सीएम झालो असे मुख्यमंत्री म्हणतात, पण आम्ही टेकू दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी परळ येथे झालेल्या सभेत लगावला. 

Feb 10, 2017, 10:11 PM IST

सत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी

 आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली. 

Feb 9, 2017, 09:25 PM IST

भाजप सरकारमधून सेनेला हकलून देईल - पृथ्वीराज चव्हाण

राज्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीही हाकलून देतील, आता सत्तेला सुरुंग लागण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. 

Feb 9, 2017, 07:15 PM IST

महापालिकेच्या निकालावर फडणवीस सरकारचं भवितव्य...

 एका महत्त्वाच्या बातमीनं बातमीपत्राची सुरूवात करूयात....मुंबई महापालिकेच्या निकालांवरच फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र राज्यात निर्माण झालंय. 

Feb 9, 2017, 06:01 PM IST

युती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे

 याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

Feb 8, 2017, 07:36 PM IST

फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

राज्यामध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळपास रोजच कुरबुरी सुरु आहेत.

Feb 6, 2017, 05:49 PM IST

सरकारने ऐकलं नाही म्हणून गावकऱ्यांनीच घेतला रस्ता बनवायला

छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजप जरी विकासाचे दावे करत असले तरी, छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात वेगळंच चित्र आहे. येथे लोकांना ३ किलोमीटर जाण्यासाठी २५ ते ३० किलोमीटर फिरून जावं लागत होतं. गावकऱ्यांनी अनेकदा येथे ३ किलोमीटरचा रस्ता बनवण्याची मागणी केली पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.

Feb 5, 2017, 01:03 PM IST

बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकले तर होणार चौकशी

नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे.

Feb 3, 2017, 05:58 PM IST

डिजीटल इंडियासाठी मोदी सरकारने केल्या या उपाय योजना

डिजीटल इंडियासाठी नरेंद्र मोदी सरकारने काही योजना आखल्याचं सांगितलं, यात सर्वाधिक महत्वाचं आणि प्रभावी भीम अॅप ठरणार असल्याचा दावा होत आहे. 

Feb 1, 2017, 04:13 PM IST

15 हजारांपेक्षा कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

15 हजार आणि त्याहून कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारनं खुशखबरी दिलीय. 

Jan 28, 2017, 11:10 PM IST

धार्मिक फोटो हटवण्याबाबतचे परिपत्रक सरकार रद्द करणार

सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो परिपत्रक रद्द करण्यात येणार आहे. आज शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या परिपत्रकाविषयी पक्षाची नाराजी बोलून दाखवली. या बैठकीनंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी परिपत्रक रद्द करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिली आहे.

Jan 27, 2017, 11:01 AM IST

सरकारच्या विभागांमध्ये ५० हजाराच्या वर खरेदीला बंदी

सरकारच्या विभागांमध्ये या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत वस्तूंच्या खरेदीच्या प्रस्तावावर बंदी आणण्यात आलीय.

Jan 18, 2017, 08:13 PM IST

विषारी दारूच्या नावाने सरकारचं चांगभलं

विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवली आहे. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.

Jan 17, 2017, 08:44 PM IST