संप

मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस

आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.

Apr 1, 2014, 12:17 PM IST

बेस्ट चालक-वाहकांचा संप, सर्वसामान्यांचे हाल

बेस्ट चालक-वाहकांनी अचानक संप केल्याने पहाटेपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्यांचे हाल होत आहेत. १२ तासांची ड्युटी केल्याने बेस्ट चालक-वाहक बेस्ट बंद आंदोलन केले आहे.

Apr 1, 2014, 08:35 AM IST

बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर

बँकेशी संबंधित तुमचं आज आणि उद्या काही काम असेल, तर बँकेची फेरी तुम्ही न मारलेली बरी. कारण आज आणि उद्या देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे.

Feb 10, 2014, 10:00 AM IST

राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी 13 फेब्रुवारीपासून संपावर जाणारेत. 5 दिवसांचा आठवडा करावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचा-यांनी केलीय.

Feb 4, 2014, 07:40 PM IST

विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, मंत्र्यांचं आश्वासन

आरोग्य विज्ञान विघापीठानं दुहेरी पेपर तपासणी सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी आहे. पेपर दोघांकडून तपासून घेऊन त्याची सरासरी काढण्याची पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. यामुळे मेडिकलचे तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळं ही पद्धत बदलण्याची मागणी जोर धरतेय. मार्डनंही याविरोधात संपाची हाक दिलीये.

Oct 14, 2013, 08:29 PM IST

महसूल कर्मचाऱ्यांचा संप, सामान्यांचे हाल

राज्यभरातले 70 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल कर्मचा-यांनी आपल्या 24 प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय. या संपामुळे पेन्शन, उत्पनाचा दाखलाकरता येणा-या सामान्य नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागतायत.

Aug 19, 2013, 11:58 PM IST

रिक्षाचालकांचा 21 ऑगस्टपासून राज्यव्यापी संप

राज्यातल्या रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. राज्यभरातले सर्व रिक्षाचालक येत्या २१ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. मुंबईत रिक्षाचालक आणि मालक संघटना कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय.

Aug 12, 2013, 07:18 PM IST

बजाजमधील `बंद`वर तोडगा कधी निघणार?

पिंपरी चिंचवड जवळील चाकण इथल्या बजाज ऑटो प्लांट मधल्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदचा आज चाळीसावा दिवस आहे. कामगार आणि बजाज प्रशासन दोन्हीही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामूळं यातून अजूनही तोडगा निघालेला नाही.

Aug 3, 2013, 06:19 PM IST

मुंबईकरांना दिलासा, बेस्ट, रिक्षांचा नियोजित संप मागे

कामगार नेते शरद राव यांनी उद्यापासून संप मागे घेतलाय. राज्य आश्वासन मिळाल्यामुळे संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्य़ात आला.

Jun 17, 2013, 06:16 PM IST

अखेर व्यापाऱ्यांचा संप मागे

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यापा-यांनी संप मागे घेत असल्याचं जाहिर केलं. पुणे पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाण्याच्या व्यापा-यांनी संप मागे घेत असल्याचं सांगितलं.

May 20, 2013, 11:59 PM IST

ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू- राज

LBTच्या मुद्द्यावरून संपावर असलेल्या व्यापा-यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय.

May 12, 2013, 07:17 PM IST

मुख्यमंत्री म्हणतात, धमकी द्यायचं काम नाही!

‘चर्चेसाठी मी नेहमीच तयार आहे, पण मला कुणीही धमकी देऊ नये’ असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी संपकऱ्यांना दिलाय.

May 11, 2013, 08:15 PM IST

निवासी डॉक्टरांचा संप, रूग्णांचे हाल

निवासी डॉक्टरांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने रूग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. त्यामुळे रूग्णांना पुन्हा एकदा वेठीस धरलं जातयं.

Apr 23, 2013, 10:49 AM IST

मुख्यमंत्र्यांनी फटकारले प्राध्यापकांना

गेल्या ७८ दिवसांपासून संपावर गेलेल्या प्राध्यापकांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फटकारलयं. संप करुन विद्यार्थी आणि सरकारला वेठिस धरु नका अन्यथा कठोर कारवाई करु असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

Apr 22, 2013, 04:35 PM IST

'बीएससी' आणि 'टीवायबीकॉम'च्या परीक्षा अडचणीत!

गेल्या 41 दिवसांपासून एमफुक्टोने पुकारलेला बहिष्कार चिघळला आहे. मंगळवारपासून कोणतीही परीक्षा होऊ देणार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला असून यामुळे सुरु असलेले बीएस्सी प्रात्यक्षिक आणि टीवाय बीकॉमच्या परीक्षा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Mar 18, 2013, 08:00 PM IST