बेस्ट चालक-वाहकांचा संप, सर्वसामान्यांचे हाल

बेस्ट चालक-वाहकांनी अचानक संप केल्याने पहाटेपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्यांचे हाल होत आहेत. १२ तासांची ड्युटी केल्याने बेस्ट चालक-वाहक बेस्ट बंद आंदोलन केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2014, 08:35 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बेस्ट चालक-वाहकांनी अचानक संप केल्याने पहाटेपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्यांचे हाल होत आहेत. १२ तासांची ड्युटी केल्याने बेस्ट चालक-वाहक बेस्ट बंद आंदोलन केले आहे.
बेस्ट प्रशासनाने कॅनेडियन कामकाजाची पद्धत आजपासून लागू केल्याने बस बंदचे आंदोलन पुकारले. आता बारा तास सेवा करावी लागल्याने चालक-वाहक नाराज आहेत. त्यांना या नव्या कामकाज पद्धतीला विरोध केलाय. त्यामुळे बारा तासांच्या वेळापत्रकावर चालक-वाहकांनी बहिष्कार टाकलाय.

काय आहे ही कॅनेडियन पद्धत
- बेस्टमधली कामाची पद्धत
बदलण्यासाठी कॅनेडियन
कंपनीला कॉन्ट्रॅक्ट
- कॅनेडियन कंपनीनं बेस्टच्या
सगळ्या डेपोंमध्ये
सर्व्हे केला
- ४ तास काम,
४ तास विश्रांती,
४ तास पुन्हा कामाची शिफारस
- बसेसचे ड्रायव्हर्स आणि
कंडक्टर्सना यापद्धतीनं
काम करण्याची शिफारस
- कॅनेडियन कामकाजानुसार
१२ तासांची शिफ्ट

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.