विधान परिषद निवडणूक

शिवसेना विधान परिषद सभापती निवडणूक लढवणार

विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे अर्ज भरणार असून भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं शिवसेनेनं सांगितलंय. 

Mar 19, 2015, 11:01 AM IST

विधान परिषद : महायुतीमध्ये महाभारत, शायना-भांडारींना डावलले

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये महाभारत सुरू होण्याची चिन्ह आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर झाले असून यात भाजपनं मित्र पक्षातील दोघांना उमेदवारी दिली. तर शायना एनसी आणि माधव भांडारी यांनी डावलले.

Jan 20, 2015, 01:11 PM IST

विधान परिषदेसाठी सेनेचे देसाई, भाजपकडून जानकरांना संधी

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपनं देखील आपले उमेदवार निश्चित केलेत. मात्र त्यांची नाव अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलीत.

Jan 20, 2015, 09:03 AM IST

भाजपकडून पुन्हा मित्रपक्षांना दगा, विधान परिषदेसाठी ठेंगा

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या  निवडणुकीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसण्याची तयारी भाजपनं केली आहे. या चारपैकी ३ जागा भाजप स्वतः लढवणार आहे. तर एक जागा शिवसेनेला सोडणार आहे. 

Jan 16, 2015, 05:23 PM IST

राष्ट्रवादीच्या दबावापुढे काँग्रेसची शरणागती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढं पुन्हा एकदा काँग्रेसला सपशेल लोटांगण घालावं लागलं... काँग्रेसच्या हक्काची जागा असतानाही, मोहन जोशींना आपला उमेदवारी अर्ज मागं घेणं भाग पडलं. त्यामुळं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालीय.

Aug 14, 2014, 07:30 PM IST

दोन्ही काँग्रेसची बैठक, मुंडेची बैठकीवर टीका

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काल तातडीची बैठक झाली. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित होते. विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

May 12, 2014, 10:05 AM IST

राहुल नार्वेकरांनी घेतली शरद पवारांची भेट!

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शरद पवारांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, नार्वेकरांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून माघार घेतली होती. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज आहे.

Mar 16, 2014, 03:49 PM IST

काका गोपीनाथ मुंडेंच्या नाकावर टिच्चून धनंजय मुंडेंचा विजय

काकांच्या छत्राखालून बाहेर पडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनीच बाजी मारलीय पण, राष्ट्रवादीच्या तिकिटावर...

Sep 2, 2013, 06:17 PM IST

नाशकात चिठ्ठीची कमाल, राष्ट्रवादीला लॉटरी

विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाचा निकाल अखेर नाट्यमय पद्धतीनं लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयंत जाधव यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणेंचा चिठ्ठी पद्धतीनं पराभव केला. जयंत जाधवांना नशीबानं साथ दिल्यानं जास्त मतांची जमवाजमव करूनही शिवसेनेच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

May 29, 2012, 08:26 AM IST